Pune Corona | आणखी चार अधिकारी दिमतीला, अजित पवारांचा निर्णय, पुणे कोरोनाविरुद्ध लढाईचं नियोजन

पुण्यातील कोरोना प्रतिबंधक कार्यवाही अधिक प्रभावी आणि गतीमान करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आणखी एक पाऊल टाकलं (Pune Covid 19 Special Officer Appoint) आहे.

Pune Corona | आणखी चार अधिकारी दिमतीला, अजित पवारांचा निर्णय, पुणे कोरोनाविरुद्ध लढाईचं नियोजन
Follow us
| Updated on: Apr 27, 2020 | 4:58 PM

पुणे : पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत (Pune Covid 19 Special Officer Appoint)  आहे. पुण्यातील कोरोना प्रतिबंधक कार्यवाही अधिक प्रभावी आणि गतीमान करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आणखी एक पाऊल टाकलं आहे. अजित पवारांच्या निर्देशानुसार चार वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची पुणे शहरासाठी विशेष नियुक्ती करण्यात आली आहे.

अनिल कवडे, सौरभ राव, सचिंद्र प्रतापसिंग आणि कौस्तुभ दिवेगावकर अशी या चार अधिकाऱ्यांची नावे (Pune Covid 19 Special Officer Appoint) आहेत. हे अधिकारी पुणे विभागीय आयुक्त आणि पुणे महापालिका आयुक्तांना कोरोनाविरुद्धच्या लढाईत सहाय्य करतील. राज्याच्या मुख्य सचिव कार्यालयातर्फे आज यासंबंधीचे आदेश जारी करण्यात आले.

अनिल कवडे हे राज्याचे सहकार आयुक्त आहेत. तर सौरभ राव यांच्याकडे साखर आयुक्तपदाची जबाबदारी आहे. सचिंद्र प्रतापसिंग यांच्याकडे पशुसंवर्धन आयुक्त आणि कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे भूजल सर्व्हेक्षण संचालकपदाचा कार्यभार आहे.

हे चारही अधिकारी मूळ जबाबदारी सांभाळून पुणे महापालिका क्षेत्रातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी सेवा देणार आहेत. या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे पुणे शहरातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होईल. तसेच शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव लवकर नियंत्रणात येण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत (Pune Covid 19 Special Officer Appoint) आहे.

पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतीच

पुण्यात आतापर्यंत 78 कोरोनाबळी गेले आहे. तर पुणे जिल्ह्यात रविवारी (26 एप्रिल) 80 नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ झाली. यामुळे पुण्यातील एकूण रुग्णांचा आकडा 1 हजार 264 वर पोहचला आहे. तर दिवसभरात पाच कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले.

संबंधित बातम्या : 

अजित पवारांच्या नेतृत्वात मंत्रिमंडळ बैठक, राज्यपालांना उद्धव ठाकरेंच्या नियुक्तीची आठवण करुन देणार

Covid 19 | पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्र्याच्या बैठकीतील महत्त्वाचे 20 मुद्दे

Non Stop LIVE Update
बारामतीनंतर शिरूरमध्ये तुतारीचा संभ्रम होणार? आयोगान कुणाला दिल चिन्ह?
बारामतीनंतर शिरूरमध्ये तुतारीचा संभ्रम होणार? आयोगान कुणाला दिल चिन्ह?.
खैरेंनी मुस्लिमांना सांगितल, 5 वेळा नमाज पडा; शिरसाटांनी व्हिडीओ लावला
खैरेंनी मुस्लिमांना सांगितल, 5 वेळा नमाज पडा; शिरसाटांनी व्हिडीओ लावला.
महाराष्ट्रातील नरेंद्र मोदींच्या सभांच्या झंझावातावर विरोधकांचा निशाणा
महाराष्ट्रातील नरेंद्र मोदींच्या सभांच्या झंझावातावर विरोधकांचा निशाणा.
महायुतीत मुंबईत 2 जागांवर सस्पेन्स, 'या' उमेदवारांची चर्चा, कधी घोषणा?
महायुतीत मुंबईत 2 जागांवर सस्पेन्स, 'या' उमेदवारांची चर्चा, कधी घोषणा?.
जप्तीनंतर भेट; लवकरच शरद पवार गटाच्या अभिजीत पाटलांचा भाजपात प्रवेश?
जप्तीनंतर भेट; लवकरच शरद पवार गटाच्या अभिजीत पाटलांचा भाजपात प्रवेश?.
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.