Pune | “मलाही अनेक आजार, पण मागे हटलो नाही”, पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर निवृत्त

दीपक म्हैसेकर विभागीय आयुक्त म्हणून आज निवृत्त झाले. कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी पत्रकार परिषद घेताना म्हैसेकर यांनी आपले अनुभव सांगितले

Pune | "मलाही अनेक आजार, पण मागे हटलो नाही", पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर निवृत्त

पुणे : मलासुद्धा अनेक आजार आहेत, पण मी मागे हटलो नाही (Pune Divisional Commissioner Deepak Mhaisekar). पॉझिटिव्हपणे योग्य दक्षता घ्यावी” असा सल्ला पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिला. विभागीय आयुक्त म्हणून आज ते निवृत्त झाले. कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी पत्रकार परिषद घेताना म्हैसेकर यांनी आपले अनुभव सांगितले (Pune Divisional Commissioner Deepak Mhaisekar).

“मला सुद्धा अनेक आजार आहेत, पण त्यामुळे मी मागे हटलो नाही. पॉझिटिव्ह आणि योग्य दक्षता घ्यावी, आज मुबलक प्रमाणात, मानसिक तयारी महत्वाची आहे”, असं दीपक म्हैसेकर यांनी सांगितलं.

“वेगवेगळ्या विभागाचं समन्वय हे मोठं आव्हान आहे. पालिका, सरकारी आणि खासगी रुग्णालयात यांच्या नागरिकांत समन्वय साधणे मोठं आवाहन आहे. सध्या पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याचं मोठं आव्हान आहे. त्यासाठी सेंट्रल वाईज नियंत्रण सोमवारपासून सुरु करत आहोत”, अशी माहिती दीपक म्हैसेकर यांनी दिली.

अजित पवारांनी केलेलं कौतुक, हे त्यांचं मोठेपण : दीपक म्हैसेकर

“अजित पवार यांनी कौतुक केलं, हे त्यांचे मोठेपण आहे, सर्वजण इतर अधिकारी सुद्धा आपल्या परीने काम करत आहे, सध्या आरोग्य यंत्रणेवर फार ताण आहे”, असं म्हैसेकरांनी सागंतिलं.

“काल झालेल्या बैठकीनंतर आमची अधिकाऱ्यांची पुन्हा बैठक झाली. आमच्या चुका किंवा रिपोर्टिंगमध्ये काही समस्या असेल तर त्या दूर केल्या जातील”, अशी माहिती दीपक म्हैसेकरांनी दिली (Pune Divisional Commissioner Deepak Mhaisekar).

चुकीचा आरोप झाला तर दुःख हे वाटतं : दीपक म्हैसेकर

“ग्रामीण भागात प्रादुर्भाव संदर्भात भाजी दूध खरेदी करताना मास्क वापरत नाही, त्यामुळे प्रसार होतो, अशा नागरिकांची आम्ही टेस्टिंग करतो. चांगलं काम करत असताना राजकीय आरोप झाल्यावर आम्हाला पण वाईट वाटतं. आम्ही सामान्य नागरिकांसाठी काम करतो, तर ते लोकप्रतिनिधी असतात. ते त्यांचं काम करतात, आम्ही आमचं काम करतो. मात्र, चुकीचा आरोप झाला तर दुःख हे वाटतंच”, असंही दीपक म्हैसेकर म्हणाले.

विकएन्डला दोन दिवस लॉकडाऊनवर अद्याप निर्णय नाही : दीपक म्हैसेकर

“14 दिवस हा जिल्ह्याचा सध्याचा रुग्ण दुप्पट होण्याचा दर आहे. त्याचबरोबर विकएन्डला दोन दिवस लॉकडाऊन असा प्रस्ताव आहे, त्यावर मात्र अजून निर्णय घेण्यात आलेला नाही”, असंही विभागीय आयुक्तांनी सांगितलं.

Pune Divisional Commissioner Deepak Mhaisekar

संबंधित बातम्या :

पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर होम क्वारंटाईन, ड्रायव्हरला कोरोना

रिपोर्टपूर्वीच पुण्यात एक हजार कोरोनाबळी, महापौरांचा दावा, मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI