पुणे विभागातील 230 रुग्णांची कोरोनावर मात, बाधितांची संख्या 1457 वर : विभागीय आयुक्त

पुणे विभागातील 230 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली (Pune Divisional Commissioner) असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

पुणे विभागातील 230 रुग्णांची कोरोनावर मात, बाधितांची संख्या 1457 वर : विभागीय आयुक्त
Follow us
| Updated on: Apr 27, 2020 | 7:58 PM

पुणे : पुणे विभागातील 230 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली (Pune Divisional Commissioner) असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. पुणे विभागातील कोरोनाबाधितांचा आकडा 1,457 वर पोहोचला असून 88 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, सध्या पुणे विभागात 1,139 रुग्णांवर उपचार सुरु आहे. यापैकी 48 रुग्णांची प्रकृती गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, असं डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितलं (Pune Divisional Commissioner).

“पुणे विभागात 1457 बाधित रुग्ण असून 88 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्ह्यात 1319 रुग्ण असून 80 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्ह्यात 33 बाधित रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात 65 बाधित रुग्ण असून 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्यात 29 बाधित रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यात 11 बाधित रुग्ण आहेत”, अशी माहिती डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

“पुणे विभागामध्ये आजपर्यत एकूण 15,811 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 14,935 चा अहवाल प्राप्त झाला आहे. 877 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 13,428 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 1,457 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे”, असं डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितलं.

पुणे विभागामध्ये आजपर्यत 54 लाख 35 हजार 546 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणाअंतर्गत 2 कोटी 6 लाख 3 हजार 94 व्यक्तींची तपासणी केली आहे, अशी माहिती डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

देशात गेल्या 24 तासात 1463 नवे कोरोनाबाधित रुग्ण

दरम्यान, देशात गेल्या 24 तासात 1463 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 60 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात 24 तासातील मृत्यूचा हा सर्वाधिक आकडा आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 28,380 वर पोहचला आहे. यापैकी 6,362 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर 886 रुग्णांचा बळी गेला आहे. देशात सध्या 21, 132 रुग्णांवर उपचार सुरु आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

संबंधित बातम्या :

देशभरात कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या 22.17 टक्क्यांवर, 85 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसात एकही नवा रुग्ण नाही

Non Stop LIVE Update
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.