पुण्यात बनावट नोटांच्या रॅकेटचा भांडाफोड, 47 कोटी 60 लाखांच्या बनावट नोटा जप्त

पुण्यात बनावट नोटांच्या रॅकेटचा भांडाफोड, 47 कोटी 60 लाखांच्या बनावट नोटा जप्त

या कारवाईत तब्बल 47 कोटी 60 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. बनावट नोटांच्या माध्यमातून नागरिकांच्या फसवणुकीचा मुख्य उद्देश असल्याचं तपासात उघड झाले.

Nupur Chilkulwar

|

Jun 10, 2020 | 11:53 PM

पुणे : पुण्यात कोट्यवधी रुपयांच्या बनावट नोटांच्या (Pune Fake Currency Racket) रॅकेटचा भांडाफोड करण्यात आला आहे. या कारवाईत लष्करी जवनासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. 6 भामट्यांकडे देशी आणि विदेशी बनावट नोटा आढळून आल्या आहेत. या कारवाईत तब्बल 47 कोटी 60 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या (Pune Fake Currency Racket) आहेत. बनावट नोटांच्या माध्यमातून नागरिकांच्या फसवणुकीचा मुख्य उद्देश असल्याचं तपासात उघड झाले.

या कारवाईत शेख अलीम गुलाब खान, सुनील सारडा, रितेश रत्नाकर, तूफेल अहमद मोहम्मद इशक खान, अब्दुल गणी रहमतुल्ला खान, अब्दुल रहमान अब्दुल गणी खान यांना अटक करण्यात आली. या सहा भामट्यांकडे देशी, विदेशी बनावट आणि चिल्ड्रन बँकेचा मार्क असलेल्या नोटा आढळून आल्या आहेत.

या कारवाईत बंगल्यातून छुपे कॅमेरे, दोन बंदूक, संगणक, लॅपटॉप, प्रिंटिंग मशीनसह इतर साहित्य जप्त करण्यात आलं आहे. पुणे गुन्हे शाखा आणि लष्कराच्या गुप्तचर पथकाने या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या बनावट नोटांची मोजणी मशीनने रात्री उशिरापर्यंत सुरु होती. बँकेचे अधिकारी आणि पोलिसांच्या उपस्थितीत नोटांची मोजणी सुरु होती.

पुण्यातील विमानतळ परिसरात बनावट नोटांचे रॅकेट असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, लष्कर आणि पोलिसांनी सापळा रचून ही धडक कारवाई केली. यावेळी एका बंगल्यात बनावट नोटा सापडल्या आहेत.

बंगल्यातील एका खोलीत बनावट नोटांची थप्पी लावली होती. तर तीन मोठ्या ट्रंकमध्ये नोटा ठेवल्या होत्या. या नोटांमध्ये 2 हजार, 500 आणि 1 हजाराच्या नोटा होत्या. त्याचबरोबर विदेशी चलनही होतं. बंगल्यात कोणी प्रवेश करु नये म्हणून चार विदेशी कुत्री पाहारा देण्यासाठी ठेवण्यात आली होती. याबाबतचा पुढील तपास सुरु आहे (Pune Fake Currency Racket ).

संबंधित बातम्या :

पुण्यात खासगी हेलिकॉप्टर सेवा सुरु, एकावेळी 6 प्रवासी, ताशी 85 हजार दर

पुण्यात कुत्र्याला वाचवण्याच्या नादात कार विहिरीत कोसळली, आईसह दोन चिमुकल्यांचा अंत

पुण्यात कार्टून बघण्यास कुटुंबाचा विरोध, 13 वर्षीय मुलाची मामाच्या घरी आत्महत्या

गृहमंत्र्यांसह 3 मंत्र्यांनी बदलीसाठी शिफारस केलेला पुण्यातील हवालदार चक्क लाचखोर

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें