पुण्यात किरकोळ भाज्यांचे दर गगनाला, कोरोना संकट काळात ग्राहकांच्या खिशाला कात्री

किरकोळ बाजारात भाज्यांचे भाव 30 ते 40 टक्क्याने वाढले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या संकटातही ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत (Vegetable Price hike Pune) आहे.

पुण्यात किरकोळ भाज्यांचे दर गगनाला, कोरोना संकट काळात ग्राहकांच्या खिशाला कात्री

पुणे : कोरोना विषाणूंचा फैलाव रोखण्यासाठी पुण्यातील मार्केट यार्ड बंद (Vegetable Price hike Pune) ठेवण्यात आले आहे. त्यामुळे पुणे शहरात किरकोळ बाजारातील भाज्यांच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात भाज्यांचे भाव 30 ते 40 टक्क्याने वाढले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या संकटातही ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे.

भाजी व्यापारांकडे मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने व्यापारांनी ही दरवाढ केली आहे. यामुळे पुण्यातील मोशी, खडकी, उत्तम नगर आणि मांजरीचा उपबाजार सुरू करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न सुरु आहेत.

पुण्यात काही ठिकाणी टोमॅटोचे दर 60 रुपये किलोवरुन 80 रुपये किलो करण्यात आले आहेत. तर कोबी हा काही ठिकाणी 80 रुपये किलो रुपये दराने विकला जात आहे. तर डेक्कन परिसरात काही भाज्या या 120 वरुन 160 रुपये किलो रुपये दराने विकल्या जात आहे.

पुण्यात भाज्यांचे दर

 • भेंडी – आता 100 ते 120 रुपये किलो (पूर्वी 70 ते 80 रुपये किलो)
 • गवार – आता 100-120 किलो (पूर्वी 70 ते 80 रुपये किलो)
 • टोमॅटो – आता 40 ते 50 रुपये किलो (पूर्वी 20 ते 30 रुपये किलो)
 • वांगी – आता 80 किलो (पूर्वी 50 ते 60 रुपये किलो)
 • कोबी – आता 40 रुपये किलो (पूर्वी 20 ते 30 रुपये किलो)
 • फ्लावर – आता 70- 80 रुपये किलो (पूर्वी 50 ते 60 रुपये)
 • बटाटा – आता 50 ते 60 रुपये (पूर्वी 40 रुपये किलो)
 • कांदा – आता 40 ते 50 रुपये किलो (पूर्वी 30 रुपये किलो)
 • दोडका – आता 80 रुपये किलो (पूर्वी 50 ते 60 रुपये)
 • कोथिंबीर – वीस रुपये जुडी
 • मिरची – आता 100 रुपये किलो (पूर्वी 70 ते 80 किलो)
 • लिंबू – प्रत्येकी दहा रुपये

पुण्यातील मार्केट यार्डही बंद

पुण्यातही दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने पुण्यातील मार्केट यार्डही बंद करण्यात आलं आहे. याठिकाणी भाजीपाला, फळ, कांदा-बटाटा आणि केळी बाजार बंद करण्यात आला आहे. पुढील सूचना येईपर्यंत हे मार्केट बंद असेल असं सांगितलं आहे. त्यामुळे ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत (Vegetable Price hike Pune) आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI