भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय पुढील शैक्षणिक वर्षात सुरु होण्याचा मार्ग सुकर : पुणे महापौर

लवकरच पुणेकरांच्या सेवेत वैद्यकीय महाविद्यालय उभारले जाईल, असा विश्वास महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय पुढील शैक्षणिक वर्षात सुरु होण्याचा मार्ग सुकर : पुणे महापौर
मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे

पुणे : भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय पुढील शैक्षणिक वर्षात सुरु होण्याचा मार्ग सुकर झाला असल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिला आहे. वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेतील महत्त्वाचा टप्पा असलेल्या एमयूएचएसने राज्य शासनाला सकारात्मक शिफारस केली आहे. त्यामुळे आता राज्य शासन आणि मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाची मान्यता मिळाल्यानंतर पुढील शैक्षणिक वर्षात वैद्यकीय महाविद्यालय सुरु होईल, असा विश्वास मोहोळ यांनी व्यक्त केला. (Pune Mayor Murlidhar Mohol on  Atal Bihari Vajpayee Medical College)

पुणे महानगरपालिकेचा स्थायी समितीचा अध्यक्ष असताना 2017 मध्ये पुणे महापालिकेच्या माध्यमातून भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय साकारण्यात यावे, अशी संकल्पना मुरलीधर मोहोळ यांनी मांडली होती तसेच निधीही उपलब्ध करून दिला होता.

मुख्यसभेच्या माध्यमातून महाविद्यालय स्थापनेसाठी ट्रस्ट स्थापून करुन राज्य सरकारच्या मान्यतेनंतर ट्रस्टच्या माध्यमातून महाविद्यालय उभारण्यासाठी पुणे महापालिकेसोबत अनेक सामंजस्य करार, आवश्यक असलेली जागा, इतर तांत्रिक बाबींची पूर्तता केली. वैद्यकीय महाविद्यालयाच्या पुढील परवानगीसाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला (एमयूएचएस) प्रस्ताव सादर केला. यावेळी अनेक दिवस अडकलेल्या प्रस्तावाला वैयक्तिक लक्ष घालून कुलगुरू डॉ. दीपक म्हैसेकर व वैद्यकीय शिक्षक संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्याशी संपर्क साधून सातत्याने पाठपुरावा केला. या कामाला आता अंतिम स्वरुप प्रप्त होत असल्याचं मोहोळ म्हणाले.

वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेतील अतिशय महत्त्वाचा टप्पा म्हणजे एमयूएचएसने राज्य शासनाला सकारात्मक शिफारस केली आहे. त्यामुळे आता राज्य शासन आणि मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाची मान्यता मिळाल्यानंतर पुढील शैक्षणिक वर्षात म्हणजेच 2021-2022 मध्ये वैद्यकीय महाविद्यालय नक्की सुरू होईल याची खात्री वाटते. कोरोनासारख्या साथीच्या आजारांवर मात करण्यासाठी स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालय यंत्रणेची गरज आहे. लवकरच पुणेकरांच्या सेवेत वैद्यकीय महाविद्यालय उभारले जाईल, असा विश्वासही महापौर मोहोळ यांनी व्यक्त केला.

(Pune Mayor Murlidhar Mohol on  Atal Bihari Vajpayee Medical College)

संबंधित बातम्या

होय, पांडुरंगच्या मृत्यूला व्यवस्थेतील त्रुटी जबाबदार, मी मान्य करतो : महापौर मुरलीधर मोहोळ

“फील्डवर छान काम, आता काळजी घ्या” पुण्याचे कोरोनाग्रस्त महापौर मुरलीधर मोहोळ यांना मुख्यमंत्र्यांचा फोन

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI