पुण्यात 5500, तर नागपुरात साडे नऊ हजार नागरिकांचे घरी जाण्यासाठी अर्ज, वैद्यकीय तपासणीनंतर परवानगी

ही प्रक्रिया असल्याने नागरिकांनी थोडा संयम पाळावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी (Pune Nagpur Migrant workers) केलं आहे.

पुण्यात 5500, तर नागपुरात साडे नऊ हजार नागरिकांचे घरी जाण्यासाठी अर्ज, वैद्यकीय तपासणीनंतर परवानगी
Follow us
| Updated on: May 03, 2020 | 6:25 PM

पुणे : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊन वाढवण्यात आले (Pune Nagpur Migrant workers) आहे. मात्र लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरिकांना घरी परतण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे. पुण्यातून गावी जाण्यासाठी तब्बल साडेपाच हजार जणांनी प्रशासनाकडे अर्ज दाखल केला आहे. तर नागपुरातून परराज्यात जाण्यासाठी किंवा परराज्यातून नागपुरात येण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला साडे नऊ हजार नागरिकांचे अर्ज दाखल झाले आहेत.

पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून जिल्हा प्रशासनाला ई-मेलद्वारे अर्ज मिळण्यास सुरुवात (Pune Nagpur Migrant workers) झाली आहे. त्यानुसार कालपर्यंत जवळपास साडेपाच हजार अर्ज जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. पुणे शहर हे रेड झोनमध्ये असल्याने नागरिकांना गावी परतण्यासाठी अडचणी येत आहेत. सध्या सर्व माहिती संकलित करण्यात येत असून अद्याप कोणालाही परवानगी देण्यात आलेली नाही, असे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

तर दुसरीकडे नागपुरातून परराज्यात जाण्यासाठी किंवा परराज्यातून नागपुरात येण्यासाठी कालपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाला 9,500 अर्ज प्राप्त झाले आहेत. याचे वर्गीकरण करुन मजुरांना परवानगी दिली जाणार आहे.

तसेच नागपूरच्या शेलटर होममध्ये थांबलेल्या परराज्यातील नागरिकांची वैद्यकीय तपासणी सुरु झाली आहे. त्यांना डाक्टरांकडून तपासून सर्टिफिकेट दिले जात आहे.

“ही एक प्रक्रिया आहे. त्यामुळे नागरिकांनी थोडा संयम ठेवावा. ज्या जिल्ह्यातून एखाद्या ठिकाणी जायचं आहे किंवा एखाद्या जिल्ह्यातून संबंधित जिल्ह्यात यायचे असल्यास जिल्हाधिकाऱ्यांची एनओसी लागत आहे.”

“नागपूरमध्ये येण्यासाठी जवळपास 3,500 नागरिकांचे अर्ज आहेत, त्यांची प्रक्रिया सुरू आहे. ज्यांना जायचं आहे किंवा यायचं आहे त्यांना सर्दी, ताप यासारखा कुठलाही आजार नाही. यासाठी डॉक्टरांचे सर्टिफिकेट लागते, ते देणं सुरू झालं आहे. नागपूरच्या शेलटर होम मध्ये थांबलेल्या परराज्यातील नागरिकांची वैद्यकीय तपासणी सुरू झाली आहे. त्यांना डाक्टर तपासून सर्टिफिकेट देत आहे. ही प्रक्रिया असल्याने नागरिकांनी थोडा संयम पाळावा,” असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी (Pune Nagpur Migrant workers) केलं आहे.

संबंधित बातम्या : 

भिवंडीतून स्थलांतरित कामगारांसाठी उत्तरप्रदेशात जाणारी विशेष ट्रेन रवाना

सिमेंट मिक्सरमध्ये तब्बल 18 जण, घर गाठण्यासाठी मजुरांचा जीवघेणा प्रवास

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.