Pune | बेड न मिळाल्याने ठिय्या देणाऱ्या पुण्यातील रुग्णाचा मृत्यू, महापौरांचा कारवाईचा इशारा

पुण्यात बेडसाठी अलका चौकात ठिय्या देणाऱ्या रुग्णाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Pune | बेड न मिळाल्याने ठिय्या देणाऱ्या पुण्यातील रुग्णाचा मृत्यू, महापौरांचा कारवाईचा इशारा

पुणे : पुण्यात बेडसाठी अलका चौकात ठिय्या देणाऱ्या रुग्णाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू (Patient Died Who Protest To Get Bed In Hospital) झाला. याप्रकरणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही दुर्दैवी घटना असल्याचं म्हटलं आहे.

“या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. तसेच, दोषींवर कडक कारवाई करण्याचा इशारा महापौरांनी दिला. पीडित रुग्ण कोणकोणत्या रुग्णालयात गेला होता, रुग्णालयात रुग्णाला प्रवेश का नाकारला, प्रवेश नाकारल्यावेळी रुग्णालयात बेड उपलब्ध होते की नाही? याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशीनंतर दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल”, असं महापौरांनी सांगितलं.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

त्याचबरोबर काही खासगी रुग्णालयांच्या सहकार्यामुळे आयसीयू बेडची समस्या आहे. मात्र, लवकरच यावर उपयोजना करण्यात येणार आहे. मुबलक बेड उपलब्ध करण्यात येणार आहे. भविष्यात अशा घटना होणार नाही. याबाबत पुरेपूर दक्षता घेतली जाणार असल्याचंही महापौरांनी स्पष्ट केलं (Patient Died Who Protest To Get Bed In Hospital).

पुण्यात बेड्सचा प्रश्न ऐरणीवर, बेड्सअभावी रुग्णाचा मृत्यू

जिल्हा आणि पालिका प्रशासन मुबलक प्रमाणात बेड उपलब्ध असल्याचा दावा करत आहे. मात्र रुग्णांना अजूनही बेडची समस्या भेडसावत आहे. पुण्यात बेड मिळत नसल्यानं रुग्णानं चक्क अलका चौकात ठिय्या आंदोलन केलं. मंगळवार रात्री नातेवाईकांसह अर्धा तास ठिय्या दिला आहे. अखेर या प्रश्नांची दखल घेत प्रशासनाने या रुग्णाला रुग्णालयात दाखल केलं.

हेही वाचा : Pune ICU Ventilator Bed | पुण्यात आयसीयू व्हेंटिलेटरचा एकही बेड शिल्लक नाही!

मनोज कुंभार असं या रुग्णाचं नाव आहे. त्याला निमोनियाचा त्रास होत असल्याचं नातेवाईकांनी सांगितलं. तो धायरी परिसरातील रहिवासी आहे. त्रास वाढल्याने नातेवाईकांनी रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. दुपारी 1 वाजेपासून नातेवाईक रुग्णवाहिकेसह वेगवेगळ्या रुग्णालयात चकरा मारत होते. मात्र, अनेक ठिकाणी जाऊन आल्यावरही त्यांना बेड उपलब्ध झालाच नाही आणि त्यामुळे अक्षरश: कंटाळलेल्या रुग्णाने अलका चौकात ठिय्या दिला.

रुग्णासह संतप्त नातेवाईकही अलका चौकात बसून होते. त्यानंतर रात्री उशिरा विश्रांतवाडीच्या रुग्णालयात रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान या रुग्णाचा मृत्यू झाला.

Patient Died Who Protest To Get Bed In Hospital

संबंधित बातम्या :

Pune Corona | पुण्याची कोरोना आकडेवारी चुकीची, यंत्रणांच्या समन्वयाअभावी आकड्यात घोळ

Yashomati Thakur | सलोनी, ‘जिंकलंस लेकी’, मंत्री यशोमती ठाकूर यांचा फोन, बिनधास्त सलोनी भारावली

पुण्यात व्हेंटिलेटर नसल्याचा आरोप गिरीश बापटांनी फेटाळला, लॉकडाऊन एकमेव उपाय नसल्याचाही दावा

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI