पुण्यात बंद दाराआड दारुविक्री, 23 जणांना अटक, 49 हजारांची दारु जप्त

लॉकडाऊनदरम्यान दारु विक्री करणाऱ्या 23 जणांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन हजारो रुपयांचा माल जप्त करण्यात (Pune Police Liquor Shop Action) आला.

पुण्यात बंद दाराआड दारुविक्री, 23 जणांना अटक, 49 हजारांची दारु जप्त

पुणे : राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत (Pune Police Liquor Shop Action) आहे. त्यामुळे संपूर्ण भारतात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. ‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात संचारबंदी आणि लॉकडाऊन करण्यात आलं असून सर्व दारुची दुकाने बंद आहेत. मात्र लॉकडाऊनदरम्यान दारु विक्री करणाऱ्या 23 जणांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन हजारो रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

संचारबंदीमुळे संपूर्ण राज्यात दारुची दुकाने बंद ठेवण्यात आली (Pune Police Liquor Shop Action) आहे. दारु मिळत नसल्याने अनेक तळीराम हताश झाले आहेत. मात्र पुण्यात हडपसर, बिबवेवाडी, सिंहगड रोड, फरासखाना कोंढवा, मुंडवा, विमानतळ, सहकारनगर, लष्कर या पोलीस ठाण्याच्या हद्दीत मद्यविक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानुसार पुणे पोलिसांनी छापा टाकत दारुविक्री करणाऱ्या 23 जणांना अटक केली आहे. यावेळी त्यांच्यावर 22 गुन्हेही दाखल करण्यात आले. तसेच यांच्याकडून 49 हजारांची दारु आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तर अमली पदार्थ विक्री करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. यावेळी त्यांच्याकडून 3 लाख 60 हजार रुपयांचा गांजा, चरस आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुणे पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे.

दरम्यान, राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. पण नागिरक सरकारच्या सूचनांचे पालन करत नसल्याने दिसत आहे. त्यामुळे अनेकांवर कारवाई करण्यात आली (Pune Police Liquor Shop Action)  आहे.

संबंधित बातम्या : 

संचारबंदीमुळे दारु नाही, इचलकरंजीत यंत्रमाग कामगाराची आत्महत्या

राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 635 वर, 52 जण उपचारानंतर बरे, 10 लाख नागरिकांचं सर्वेक्षण : राजेश टोपे

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI