परीक्षेनंतर मित्रांसोबत पोहायला गेलेला पुण्यातील विद्यार्थी तलावात बुडाला

पुण्यातील के. जे. इन्स्टिट्यूटमध्ये डिप्लोमाचं शिक्षण घेणारा महेश शेंडगे परीक्षा संपल्यानंतर सात-आठ मित्रांच्या सोबतीने पोहण्यासाठी गेला होता. Pune Student Drown in Lake

परीक्षेनंतर मित्रांसोबत पोहायला गेलेला पुण्यातील विद्यार्थी तलावात बुडाला

पुणे : परीक्षेनंतर मित्रांसोबत पिकनिकला गेलेला पुण्यातील विद्यार्थी तलावात बुडाल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील के. जे. इन्स्टिट्यूटमध्ये शिकणारा 22 वर्षीय महेश रमेश शेंडगे काल (मंगळवार 3 मार्च) आमराई तलावात बुडाला. महेशचा शोध घेण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहेत. (Pune Student Drown in Lake)

पुण्यातील के. जे. इन्स्टिट्यूटमध्ये डिप्लोमाचं शिक्षण घेणाऱ्या महेश शेंडगेची परीक्षा नुकतीच संपली. त्यामुळे सात-आठ मित्रांच्या सोबतीने तो काल पोहण्यासाठी गेला होता. पुरंदर तालुक्यातील भिवरीमध्ये असलेल्या आमराई तलावात मित्र पोहत होते.

दुपारी तीन वाजताच्या सुमारास महेश तलावातील पाण्यात बुडाल्याचं मित्रांच्या लक्षात आलं. त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर काल रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरु होतं. परंतु रात्रीच्या अंधारात शोधकार्यात अडथळा येत असल्यामुळे शोधकार्य थांबवण्यात आलं होतं. त्यानंतर आज सकाळी सहा वाजल्यापासून शोधकार्य पुन्हा सुरु करण्यात आलं आहे.

महेश मूळचा दौंड तालुक्यातील मलठन या गावचा आहे. महेश बुडाल्यामुळे शेंडगे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तलावात महेशचा शोध घेतला जात असून सासवड पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. (Pune Student Drown in Lake)

संबंधित बातम्या :

पुण्यात नाल्यात वाहून गेलेल्या चिमुरड्याचा मृतदेह सापडला, बीडच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Published On - 10:26 am, Wed, 4 March 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI