Pune Suspected Courier | काश्मीरहून आलेल्या पार्सलवरुन गोंधळ, तीन तास पोलिसांची दमछाक

Pune Suspected Courier | काश्मीरहून आलेल्या पार्सलवरुन गोंधळ, तीन तास पोलिसांची दमछाक
Gold gift box with red ribbon and a nice fancy bow, studio isolated on white background

दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे महेश सूर्यवंशी यांना जम्मू-कश्मीरवरुन एक पार्सल आलं.

Nupur Chilkulwar

|

Aug 04, 2020 | 12:57 AM

पुणे : पुण्यात खोदा पहाड निकला चूहा, या म्हणीचा प्रत्यय आला आहे (Pune Suspected Courier From Jammu-Kashmir). जम्मू-काश्मीर मधून आलेल्या संशयित कुरियरने संभ्रम झाल्याने मोठा गोंधळ उडाला. दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे महेश सूर्यवंशी यांना जम्मू-कश्मीरवरुन एक पार्सल आलं. मात्र, या पार्सलमधील ड्रायफ्रूटच्या बॉक्सवरुन मोठा गोंधळ उडाला (Pune Suspected Courier From Jammu-Kashmir).

बॉक्समध्ये बॉम्ब असल्याची भीती बळावल्याने पोलिसांची धावपळ झाली. बॉम्ब डिस्पोजल स्कॉडच्या तपासात मात्र हा बॉम्ब नसून ड्रायफ्रुट्सचा बॉक्स असल्याचं समोर आलं. मात्र, यादरम्यान पोलिसांची तीन तास दमछाक झाली.

नेमकं प्रकरण काय?

महेश सूर्यवंशी यांना जम्मू-कश्मीर मधील जवानानं अक्रोड आणि केशराचा बॉक्स पाठवला होता. जम्मू-काश्मीरला तैनात असलेल्या लष्करी जवानाने हे पार्सल पाठवलं होतं.

मात्र, इर्शाद मीर या दुकानदारांने जवानाच्या नावाऐवजी स्वतःच्या नावाने तो बॉक्स कुरिअर केला. त्यामुळे पार्सल मिळाल्यानंतर महेश सूर्यवंशी यांचा संशय बळावला. जम्मू कश्मीर मधून संशयास्पद कुरियर आल्याने त्यांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर एकच गोंधळ उडाला.

पार्सलमध्ये बॉम्ब असण्याची भीती बळावल्याने बीडीएस पथकही दाखल झालं. बॉम्ब डिस्पोजल स्कॉड आणि श्वान पथक आणि पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. बॉम्ब डिस्पोजल स्कॉडने संशयित कुरियर बॉक्स मोकळ्या मैदानात नेला. त्यावेळी तपासात ड्रायफ्रुट्स बॉक्स आढळल्यानं सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

Pune Suspected Courier From Jammu-Kashmir

संबंधित बातम्या :

Pune Micro Containment Zones | पुणे शहरात 75 मायक्रो कंटेन्मेंट झोन जाहीर

Pune Corona : पुण्यात 10 दिवसात 625 बेडचे जम्बो रुग्णालय उभं करणार, विभागीय अधिकाऱ्यांची माहिती

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें