पुण्यात तीन वर्षांची चिमुकली ‘कोरोना’बाधित, निजामुद्दीनहून परतलेल्या आजोबांमुळे संसर्ग

आजोबा दिल्लीतील निजामुद्दीन येथे झालेल्या धार्मिक कार्यक्रमाहून परतले होते, त्यांच्याकडून नातीला 'कोरोना' संसर्ग झाला आहे. (Pune Three Years old Girl Corona Positive)

पुण्यात तीन वर्षांची चिमुकली 'कोरोना'बाधित, निजामुद्दीनहून परतलेल्या आजोबांमुळे संसर्ग

पुणे : पुण्यात अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीला ‘कोरोना’ची लागण झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. निजामुद्दीनमधील ‘तब्लिगी जमात’च्या कार्यक्रमाहून परतलेल्या आजोबांमुळे तिला संसर्ग झाल्याचा अंदाज आहे. (Pune Three Years old Girl Corona Positive)

आजोबांना ‘कोरोना’ची लागण झाल्यामुळे ते मंगळवारी पुण्यातील नायडू रुग्णालयात दाखल झाले होते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातल्या तीन वर्षांच्या मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आजोबा दिल्लीतील निजामुद्दीन येथे झालेल्या धार्मिक कार्यक्रमाहून परतले होते, त्यांच्याकडून नातीला संसर्ग झाला आहे.

पुणे जिल्ह्यातून निजामुद्दीनला 136 तब्लिगी गेले होते. त्यापैकी 94 जण पुणे उपनगर भागातून, तर उर्वरित ग्रामीण आणि पिंपरी चिंचवडमधून होते. त्यापैकी 61 वर्षीय व्यक्ती आणि त्यांची नात अशा एकाच कुटुंबातील दोघांना ‘कोरोना’ची लागण झाली आहे.

कालच्या दिवसात पुण्यात कोरोनाबाधित सात नवे रुग्ण सापडले असून, त्यापैकी दोघे निजामुद्दीनहून परत आलेले आहेत. त्यांच्या संपर्कातील इतर व्यक्तींची माहिती घेण्याचं काम पोलिस करत आहेत.

पुण्यातील ‘कोरोना’ग्रस्त रुग्णांची संख्या 46 झाली. त्यापैकी बऱ्या झालेल्या आठ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. पुणे शहरात काल एका दिवसात सात नवीन रुग्णांची भर पडली. शहरात सध्या 39 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, ग्रामीण भागात ही संख्या सातपर्यंत वाढली.

दरम्यान,  पुण्यात 50 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुण्याचे जिल्हाधिकारी दीपक म्हैसेकर यांनी ही माहिती दिली. या महिलेने कोणताही परदेशी प्रवास केला नव्हता.

(Pune Three Years old Girl Corona Positive)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI