पुण्यात हॉटेल चालकावर गोळीबार, पाच दिवसात आरोपींना अटक

पुण्यात हॉटेल चालकावर गोळीबार, पाच दिवसात आरोपींना अटक

वेल्हे तालुक्यातील हॉटेल चालकावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Nupur Chilkulwar

|

Nov 05, 2020 | 4:29 PM

पुणे : वेल्हे तालुक्यातील हॉटेल चालकावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे (Velha Crime News). गुन्ह्यात वापरलेल्या गाडीच्या आधारे पुण्याच्या ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी सापळा रचून शिताफीने या आरोपींना अटक केली (Velha Crime News).

हॉटेल चालकावर गोळीबार करणारे संदीप उर्फ सॅंडी सिद्धेश्वर धुमाळवय (वय 20), रुपेश उर्फ भैय्या श्रावण पालखे (वय 20) असे पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

वेल्हे तालुक्यातील दापोडे येथे 1 नोव्हेंबर रोजी सकाळी साडे आठ वाजताच्या सुमारास हॉटेलचालक विलास नथु बोरगे यांच्यावर अज्ञात तीन आरोपींनी गावठी पिस्टल मधून 3 राऊंड फायर केले होते. बोरगे यांना जखमी करुन आरोपींनी करंजावणे मार्गे कुसगाव खिंडीतून पलायन केले. याप्रकरणी वेल्हा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

वेल्हा पोलीस स्टेशनमधील दाखल गुन्ह्याच्या आधारे वेल्हे पोलीस आणि पुणे ग्रामीण पोलीस, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस समांतर पातळीवर आरोपींचा शोध घेत होते. यादरम्यान, त्यांना गुन्ह्यात वापरलेल्या गाडीची माहिती मिळालीय ही गाडी दत्तात्रय बाळासाहेब पवार यांच्या मालकीची असून त्यांचा मुलगा सुजित दत्तात्रय पवार हा वापरत होता. त्यानुसार, पोलिसांनी सुजितकडे सखोल चौकशी केली.

दरम्यान, ही गाडी तिघे घेऊन गेले होते. त्यातील दोघे जण भोर तालुक्यातील कुसगाव येथे असल्याची माहीती पोलिसांना सुजितने दिली. पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी त्याआधारे सापळा रचून हॉटेल चालकावर गोळीबार करणाऱ्या संदीप उर्फ सॅंडी सिद्धेश्वर धुमाळ, रुपेश उर्फ भैय्या श्रावण पालखे यांना अटक केली. यांना पोलिसांनी खाकी दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

Velha Crime News

संबंधित बातम्या :

आधी लाथाबुक्क्यांनी मारहाण, नंतर चाकूने वार, जळगावात माजी महापौराच्या मुलाची निर्घृण हत्या

दोन लाखांचे अमेरिकन डॉलर देतो सांगत ओला चालकाची फसवणूक, टोळी राज्यभर सक्रिय असल्याचा संशय

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें