AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विरारमधील भावांच्या मृत्यू प्रकरणात हलगर्जी, पुण्यातील वरिष्ठ पोलिसाची दोन वर्षे पगारकपात

येरवडा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना 2 वर्षांसाठी दहमहा 10 हजार रुपयांच्या पगार कपातीची शिक्षा ठोठावण्यात आली (Punishment to Police Inspector).

विरारमधील भावांच्या मृत्यू प्रकरणात हलगर्जी, पुण्यातील वरिष्ठ पोलिसाची दोन वर्षे पगारकपात
| Updated on: Jul 28, 2020 | 9:27 AM
Share

पुणे : येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस इस्माईल शेख यांना पगारातून 2 वर्षांसाठी दहमहा 10 हजार रुपयांची कपात करण्याची शिक्षा ठोठावण्यात आली आहे (Salary cutting Punishment to Senior Police Inspector). त्यांच्यावर विरारमधील दोन भावांच्या मृत्यू प्रकरणात हलगर्जीपणा केल्याचा ठपका आहे. पोलीस आयुक्त डॉ. के.व्यंकटेशम यांनी शेख यांच्यावर विरार प्रकरणात पोलिसांची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका ठेवत ही शिक्षा सुनावली.

युनूस शेख हे विरार पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी असताना त्यांनी विकास झा याचा हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून उपविभागीय दंडाधिकारी वसई यांच्याकडे सादर केला होता. हा प्रस्ताव सादर करताना विकास झा याच्याविरुद्ध दाखल नसलेल्या, केवळ नावात साम्य असलेल्या 3 अदखलपात्र गुन्ह्यांचा समावेश केला. वसई येथील मुनाफ बलोच याच्या हस्तक्षेपाने प्रभावित होऊन प्रस्तावाबरोबर जोडायची कागदपत्रेही पूर्वग्रहदूषित हेतूने प्रेरित होऊन वरिष्ठांकडे प्रस्ताव सादर केला. विकास झा याने वसई उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयासमोर 10 नोव्हेंबर 2017 रोजी स्वत:ला जाळून घेत आत्महत्या केली.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

भावाला न्याय मिळावा, यासाठी 2 महिने प्रयत्न केला यानंतर विकासचा भाऊ अमित झा याने देखील 20 जानेवारी 2018 रोजी उंदीर मारण्याचे औषध प्राशन केलं. याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख यांना मिळाल्यानंतर त्यांनी इतक्या गंभीर प्रकाराची माहिती वरिष्ठांना वेळेत दिली नाही, असा त्यांच्यावर आरोप आहे. तसेच अमित झा याचा मृत्यूपूर्व जबाब नोंदवण्यासाठी जबाबदार पोलीस अधिकाऱ्यास न पाठविता कनिष्ठ पोलीस कर्मचाऱ्याला पाठविले, असे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

विरारमध्ये 8 नोव्हेंबर 2017 रोजी ही घटना घडली होती. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख आणि इतरांवर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात सीआयडीने युनूस शेख यांना मार्च 2018 मध्ये अटक केली होती. या प्रकरणात अपर पोलीस अधीक्षक रायगड यांची विभागीय चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी केलेल्या चौकशीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख दोषी आढळले. सध्या शेख पुण्यातील येरवाडा येथे रुजू असल्याने हा चौकशी अहवाल पुण्यात पाठवण्यात आला.

पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी या विभागीय चौकशीच्या अहवालाचे निष्कर्ष लक्षात घेऊन पोलिसांची प्रतिमा मलिन केल्याबद्दल युनूस इस्माईल शेख यांच्या पगारातून 2 वर्षे दरमहा 10 हजार रुपये कपात करण्याची शिक्षा सुनावली.

हेही वाचा :

पुण्यात कोरोनामुक्त पोलीस समुपदेशकाची भूमिका बजावणार : रवींद्र शिसवे

Pune Lockdown | पुणेकरांकडून वारंवार नियमांचं उल्लंघन, 13 दिवसात तब्बल 8,097 नागरिकांवर कारवाई

Salary cutting Punishment to Senior Police Inspector

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.