AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पनवेलमध्ये खासगी रुग्णालयांकडून लूट, मनसेच्या तक्रारीची उपजिल्हाधिकाऱ्यांकडून दखल, आयुक्तांकडे कारवाईची शिफारस

पनवेलमध्ये खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची लूट होत असल्याचं उघड झालं आहे (Raigad Deputy Collector recommends Panvel Municipal Commissioner).

पनवेलमध्ये खासगी रुग्णालयांकडून लूट, मनसेच्या तक्रारीची उपजिल्हाधिकाऱ्यांकडून दखल, आयुक्तांकडे कारवाईची शिफारस
| Updated on: Aug 04, 2020 | 9:38 PM
Share

रायगड : पनवेलमध्ये खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची लूट होत असल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी रायगडच्या उपजिल्हाधिकारी दीपा भोसले यांनी पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी संबंधित रुग्णालयांविरोधात कारवाई करण्याची शिफारस महापालिका आयुक्तांकडे केली आहे (Raigad Deputy Collector recommends Panvel Municipal Commissioner).

पनवेल महापालिका हद्दीतील एका खासगी रुग्णालयात एक कोरोनाबाधित महिला आणि तिच्या मुलीवर एकाच बेडवर पाच दिवस उपचार करण्यात आला. मात्र, रुग्णालय व्यवस्थापनाने पीपीई किट, सॅनिटायझेशन आणि मेडिकल वेस्ट यांची स्वतंत्र आकारणी करुन त्यांच्याकडून जादा रक्कम वसूल केल्याचं समोर आलं आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष अक्षय काशीद यांनी आवाज उठवला (Raigad Deputy Collector recommends Panvel Municipal Commissioner).

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

अक्षय काशीद यांनी पत्राद्वारे उपजिल्हाधिकारी दीपा भोसले यांना माहिती दिली. याप्रकरणी दीपा भोसले यांनी साथरोग नियंत्रण अधिनियम आणि नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन तसेच मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950 नुसार, मुंबई नर्सिंग होम रजिस्ट्रेशन (सुधारित अधिनियम) 2006 नुसार कारवाई प्रस्थापित करण्याची शिफारस केली आहे.

दरम्यान, याप्रकरणी अक्षय काशीद यांनीदेखील पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांना पत्र पाठवले आहे. याशिवाय काही दिवसांपूर्वी मनसेच्या पनवेलच्या शिष्टमंडळाने महानगरपालिका हद्दीतील कोरोना रुग्णांना लादण्यात आलेल्या अवाजवी बिलांविरोधात लेखी तक्रार करत आवाज उठवला होता. मात्र, त्यानंतरही खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची लूट होत असल्याचं उघड झालं आहे.

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.