नागपूरच्या रुग्णालयातून 5 कोरोना रुग्ण पळाले, काही तासातच मध्य प्रदेशमध्ये पकडले

कोरोना उपचार घेत असताना नागपूरमधील सरकारी रुग्णालयातून पळालेल्या 5 कोरोना रुग्णांना मध्य प्रदेशमध्ये ताब्यात घेतलं आहे (Nagpur Fled corona patient detained in MP).

नागपूरच्या रुग्णालयातून 5 कोरोना रुग्ण पळाले, काही तासातच मध्य प्रदेशमध्ये पकडले

नागपूर : कोरोना उपचार घेत असताना नागपूरमधील सरकारी रुग्णालयातून पळालेल्या 5 कोरोना रुग्णांना मध्य प्रदेशमध्ये ताब्यात घेतलं आहे (Nagpur Fled corona patient detained in MP). ते रविवारी (6 सप्टेंबर) नागपूरमधून उपचारादरम्यानच पळाले. मात्र काही तासांमध्येच रेल्वे सुरक्षा दलाने त्यांना पकडले. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली.

नागपूरमध्ये सरकारी रुग्णालयात दाखल असलेले 5 रुग्ण उपचारादरम्यानच रविवारी सकाळी पळाले. यानंतर त्यांनी ट्रेनने पकडून मध्य प्रदेश गाठलं. त्यावेळी रेल्वे सुरक्षा दलाने बैतूर रेल्वे स्टेशनवर या रुग्णांना पकडण्यात आलं. कोरोना संसर्ग झालेले रुग्ण पळाल्यानंतर नागपूरच्या सरकारी रुग्णालयात एकच गोंधळाची स्थिती तयार झाली होती. मात्र, सुरक्षा रक्षकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे रेल्वे सुरक्षा दलाला या रुग्णांना पकडण्यात यश आलं.

रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकाने संबंधित रुग्ण पळाल्याची माहिती आरपीएफला दिली होती. यानंतर आमच्या कर्मचाऱ्यांनी त्यांची शोधाशोध केली. पळालेल्या रुग्णांपैकी एक महिला असून तिने नुकताच एका बाळाला जन्म दिला होता. त्यानंतर या महिलेला कोरोना संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं. रुग्णालयाकडून माहिती मिळाल्यावर रेल्वे सुरक्षा दलाने सर्व सीसीटीव्ही फुटेज चेक केले. तपासात या रुग्णांचा शोध लागला. त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन रुग्णवाहिकेतून नागपूरच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.”

दरम्यान, नागपुरात 24 तासात 54 कोरोना मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. रोजच्या मृत्यू संख्येतील ही मोठी वाढ असून यामुळे नागरिकांमध्ये देखील चिंता वाढली आहे. नागपूरकरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे.

नागपुरातील एकूण मृत्यू संख्या सध्या 1315 झाली आहे. गेल्या 24 तासात 1343 नव्या रुग्णांची भर पडली आहे. नागपूरमध्ये सध्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या 39 हजार 482 झाली आहे. दुसरीकडे 1811 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने काहीसा दिलासाही मिळाला आहे.

हेही वाचा :

शिवसेना आमदार अधिवेशनासाठी मुंबईकडे, वाटेतच मेसेज, कोरोना पॉझिटिव्ह

कोल्हापुरातील दोन तालुक्यात दहा दिवसांचा जनता कर्फ्यू, कोरोना साखळी तोडण्यासाठी निर्णय

बिलासाठी फोर्टिस रुग्णालयाचा आडमुठेपणा, नवी मुंबईतील नामांकित डॉक्टरचा मृतदेह देण्यास नकार

Nagpur Fled corona patient detained in MP

Published On - 1:00 pm, Mon, 7 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI