… अन्यथा राजू शेट्टींनी भर चौकात विष्ठा खायला तयार रहावं, सदाभाऊ खोतांची जीभ घसरली

कडकनाथ गैरव्यवहारप्रकरणात (Kadaknath Scam) थेट कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केला आहे. त्यानंतर आरोप फेटाळताना सदाभाऊ खोत यांची मात्र जीभ घसरली आहे.

... अन्यथा राजू शेट्टींनी भर चौकात विष्ठा खायला तयार रहावं, सदाभाऊ खोतांची जीभ घसरली
Follow us
| Updated on: Sep 01, 2019 | 6:30 PM

कोल्हापूर : कडकनाथ गैरव्यवहारप्रकरणात (Kadaknath Scam) थेट कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केला आहे. त्यानंतर आरोप फेटाळताना सदाभाऊ खोत यांची मात्र जीभ घसरली आहे. माझ्यावरील आरोप सिद्ध करा अन्यथा भर चौकात विष्ठा खायला तयार राहा अशी वादग्रस्त टीका सदाभाऊ खोत यांनी केली.

राजू शेट्टी म्हणाले, “कडकनाथ गैरव्यवहार करणाऱ्या महारयत अॅग्रोचे प्रमुख रयत क्रांती संघटनेचे (Rayat Kranti Organization) जिल्हाध्यक्ष आहेत. शिवाय ते कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे नातेवाईक असल्याचंही समजलं. या गोष्टी नक्कीच योगायोगाच्या नाहीत.” राजकीय आश्रय असल्याशिवाय हे शक्य नसल्याचे सांगत राजू शेट्टी यांनी अप्रत्यक्षपणे सदाभाऊ खोत यांच्यावर निशाणा साधला. तसेच या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली.

कडकनाथ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील कोंबड्या मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत जाणार आहेत का? असाही खोचक सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला. तसेच सरकारच्या भूमिकेवर टीका केली.

दुसरीकडे सदाभाऊ खोत यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावत आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले, “रयत अॅग्रो संस्थेशी माझा किंवा कुटुंबीयांचा काहीही संबंध नाही. राजू शेट्टी यांच्या आरोपात तथ्य असल्यास राजकारणातून संन्यास घेईन. अगदी भर चौकात फाशी घ्यायलाही तयार आहे. मी स्वतः 26 ऑगस्टला संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. मी मंत्री झाल्याने त्यांना पोटसूळ उठला आहे. राजू शेट्टी यांनी कडकनाथ प्रकरणात पुरावे द्यावेत अन्यथा भर चौकात विष्ठा खायची तयारी ठेवावी.”

‘बिंदू चौकात कधीही यायला तयार, फक्त येताना फसवलेल्या शेतकऱ्यांचे पैसे घेऊन या’

यावर राजू शेट्टींनी देखील उत्तर दिलं आहे. ते म्हणाले, “कोल्हापूरच्या बिंदू चौकात (Bindu Chawk, Kolhapur) यायला मी कधीही तयार आहे. फक्त त्यांनी फसवलेल्या शेतकऱ्यांचे पैसे घेऊन यावं. कडकनाथ प्रकरणाशी त्यांचा काहीही संबंध नसल्याचा दावा करत खोत यांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. मात्र, मी आरोप करताना पातळी सोडणार नाही.”

‘पोलीस मुख्य आरोपीला का पकडत नाही?’

ज्या शेतकऱ्यांनी सदाभाऊ खोत यांनी फसवणूक केल्याचा आरोप केला. त्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, पोलीस मुख्य आरोपीला का पकडत नाही? असा प्रश्न देखील शेट्टी यांनी विचारला. ते म्हणाले, “ईडी हा भाजपचाच कार्यकर्ता आहे. मात्र, या प्रकरणाची चौकशी ईडीमार्फत (ED) करायला हरकत नाही.”

सदाभाऊ खोत यांनी आपली रयत क्रांती संघटना फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा दावा केला. तसेच त्यांनी निर्भयपणे पोलिसांशी संपर्क करत तक्रार करावी, असं आवाहन सदाभाऊ खोत यांनी केलं. तसेच मी मंत्री झाल्यानेच त्यांना पोटशुळ उठल्याची टीका खोत यांनी शेट्टींवर केली.

कडकनाथ गैरव्यवहार प्रकरण काय आहे?

संदीप मोहिते, सुधीर मोहिते, गणेश शेवाळे आदींसह काही जणांनी 2017 मध्ये रयत अॅग्रोची (Rayat Agro) स्थापना केली. त्यांनी पुन्हा 2018 मध्ये महारयत अॅग्रो इंडिया लिमिटेड (Maharayat Agro India Limited) नावाने नव्या संस्थेची नोंदणी केली. त्याद्वारे लाखो रुपयांच्या नफ्याचं आमिष दाखवून शेतकऱ्यांकडून कोट्यावधी रुपये घेतले. महाराष्ट्रासह कर्नाटकमधील हजारो शेतकरी आणि बेरोजगारांनी यात 500 कोटींची गुंतवणूक केली. मात्र, त्यांची फसवणूक झाल्याचे समोर आले.

या गैरव्यवहारातील मुख्य आरोपी संदीप मोहिते कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा जावई असल्याचा आरोपही स्वाभिमानीने केला आहे. सदाभाऊ खोत या आरोपांचे खंडन केले. मात्र, त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एक लग्नपत्रिका व्हायरल केली आहे. यात सदाभाऊ खोत यांचा मुख्य आरोपीशी संबंध असल्याचं म्हटलं आहे.

संबंधित बातम्या:

कोल्हापुरात ‘कडकनाथ’वरुन सदाभाऊ आणि राजू शेट्टी आमनेसामने

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.