AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…अन्यथा कोरोनातील बळींपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतील, सरकारनं भान ठेवावं : राजू शेट्टी

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा कोरोनामुळे जेवढे बळी गेले नाही. त्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील, याचं सरकारने भान ठेवावं, असा इशारा शेट्टी यांनी दिला आहे (Raju Shetti on Farmer Suicide amid Corona situation).

...अन्यथा कोरोनातील बळींपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतील, सरकारनं भान ठेवावं : राजू शेट्टी
| Updated on: Apr 13, 2020 | 12:26 AM
Share

पुणे : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पोलिस आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण जाहीर केलं आहे. त्यानुसार शेतकरी आणि शेतमजूरांना विमा संरक्षण द्यावं, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे (Raju Shetti on Farmer Suicide amid Corona situation). लॉकडाऊनमुळे शेतीमाल सडून चाललाय. त्यामुळे त्याचा त्वरित पंचनामा करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा कोरोनामुळे जेवढे बळी गेले नाही. त्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील, याचं सरकारने भान ठेवावं, असा इशारा शेट्टी यांनी दिला आहे (Raju Shetti on Farmer Suicide amid Corona situation).

राजू शेट्टी म्हणाले, “लॉकडाऊन काळामध्ये सर्वांनी घरात कोंडून घेतलंय. मात्र अशाही परिस्थितीमध्ये बळीराजा जीव धोक्यात घालून शेतात राबतोय. शेतकरी सुरक्षेचं कोणतंही कवच नसताना जनतेच्या अन्नधान्यासाठी भाजीपाल्यासाठी कष्ट करतोय. त्यामुळे शेतकरी आणि शेतमजुरांना विमा संरक्षण देणं अत्यावश्यक आहे. लॉकडाऊन काळात शेतीला मोठा फटका बसला आहे. फळबागा, भाजीपाला सडू लागला असून रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सरकारने त्वरित शेतमालाचा पंचनामा करावा आणि नुकसान भरपाई द्यावी.”

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली तरच शेतकरी पुन्हा उभा राहील‌. अन्यथा कोरोनामुळे जेवढे बळी गेले नाहीत तेवढे शेतमाल न विकल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतील. त्यामुळे सरकारनं या गोष्टीचं भान ठेवावं आणि तात्काळ शेतकऱ्यांना विमा संरक्षण आणि नुकसान भरपाई द्यावी, असं मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं.

राज्यात सध्या हरभरा, गहू, तूर काढणी सुरु आहे. मात्र व्यापारी हमीभावाने खरेदी करत नाही. ग्राहकांना 110 रुपये किलो दराने तूर घ्यावी लागत आहे. मात्र तीच तूर व्यापारी शेतकऱ्यांकडून 40 रुपये प्रतिकिलोने विकत घेतली जात असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला.

संबंधित बातम्या :

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1982, नव्या 221 रुग्णांची नोंद

कोरोनाचा कहर, देशात 24 तासात 909 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 8,356 वर

दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द, शिक्षण विभागाचा एसएससीच्या विद्यार्थ्यांना दिलासा

भारतात ‘कोरोना’ग्रस्त तुलनेने कमी, मात्र फैलाव दर वाढता, ‘कोरोना’ कसा पसरतोय?

‘जी दक्षिण’मध्ये अडीचशे कोरोनाग्रस्त, मुंबईची वॉर्डनिहाय ‘कोरोना’ रुग्णसंख्या

Raju Shetti on Farmer Suicide amid Corona situation

पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.