धक्कादायक! 91 कोरोनामुक्त रुग्णांना पुन्हा कोरोनाची लागण, दक्षिण कोरियाच्या अडचणीत वाढ

जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत अनेक देशांमध्ये या विषाणूने आपला शिरकाव केला (Reactivate corona virus in south korea) आहे.

धक्कादायक! 91 कोरोनामुक्त रुग्णांना पुन्हा कोरोनाची लागण, दक्षिण कोरियाच्या अडचणीत वाढ
Follow us
| Updated on: Apr 11, 2020 | 10:24 PM

सीऊल (दक्षिण कोरिया) : जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत अनेक देशांमध्ये या विषाणूने आपला शिरकाव केला (Reactivate corona virus in south korea) आहे. जगभरात आतापर्यंत 17 लाखांपेक्षा अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामधून अनेक जण बरे झाले असूनही त्यांना पुन्हा लागण झाल्याचे समोर आलं आहे. दक्षिण कोरियामध्येही तब्बल 91 कोरोनामुक्त रुग्णांना पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याने सर्वत्र एकच खळबळ (Reactivate corona virus in south korea) उडाली आहे.

“कोरोनाची लागण झालेले 91 रुग्ण पूर्णपणे बरे झाल्यानंतर त्यांना आम्ही डिस्चार्ज दिला होता. पण बरे झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यांना कोरोनाची लागण झाली आहे”, असं दक्षिण कोरियाच्या आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले.

“हे 91 लोक पुन्हा कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आले असणार किंवा या रुग्णांमधील विषाणू पुन्हा रिअॅक्टिव्हेट झाले असणार”, असं कोरिया सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रीवेंशनचे डायरेक्टर जोंग इन क्योंग यांनी सांगितले.

पुन्हा कोरोनाची लागण कशी झाली हे सांगणे कठीण आहे. पुन्हा कोरोना झालेल्या रुग्णांची सध्या चौकशी सुरु आहे. दक्षिण कोरियामध्ये हे प्रकरण समोर आल्याने जगभरातील देशांची चिंता वाढली आहे. अनेक देशाची ही अपेक्षा आहे की, कोरोनाची लागण झालेले रुग्ण विषाणूच्या विरोधात आपल्या रोगप्रतिकार शक्तीच्या जोरावर बरे होतील”, असं साऊथ कोरियाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

या प्रकरणानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जर रुग्णाच्या शरीरात हे विषाणू पुन्हा रिअॅक्टिव्हेट झाले असतील. तर यावर काय उपचार करता येऊ शकतात, यावर तज्ञ काम करत आहेत. आतापर्यंत दक्षिण कोरियामध्ये कोरोनामुक्त बरे झाल्यानंतर पुन्हा कोरोनाची लागण झालेले 91 रुग्ण आहेत. तसेच पुन्हा कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता दक्षिण कोरियाने वर्तवली आहे. दक्षिण कोरियामध्ये आतापर्यंत सात हजार लोक कोरोनामुक्त झाले आहेत.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.