Duster आणि Triber सह ‘या’ गाड्यांवर रेनॉ कंपनीकडून 70 हजार रुपयांपर्यंतची सूट

अक्षय चोरगे

|

Updated on: Dec 10, 2020 | 11:43 PM

रेनॉ कंपनीने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठी ऑफर सादर केली आहे.

Duster आणि Triber सह 'या' गाड्यांवर रेनॉ कंपनीकडून 70 हजार रुपयांपर्यंतची सूट

मुंबई : रेनॉ इंडिया (Renault India Private Limited) कंपनी सातत्याने त्यांच्या गाड्यांवर शानदार ऑफर्स देत आहे. कंपनीने आता ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणखी एक मोठी ऑफर आणली आहे. रेनॉ कंपनीने त्यांच्या डस्टर या कारवर 70 हजार रुपयांचा डिस्काऊंट देऊ केला आहे. तसेच इतरही कार्सवर मोठे डिस्काऊंट दिले आहेत. ही ऑफर या महिन्यात उपलब्ध आहेच सोबतच पुढील महिन्यातदेखील ग्राहक या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. (Renault India discounts : Up to Rs 70,000 off on Duster and Triber)

Renault Duster RxS आणि Renault Duster RxZ या दोन व्हेरियंट्सवर कंपनीने 30 हजार रुपयांची सूट दिली आहे. तसेच ग्राहकांना RxS MT आणि CVT या व्हेरियंट्सवर 20,000 रुपयांच्या कॅश बेनिफिटची सुविधा दिली आहे. या ऑफरसह रेनॉ कंपनी ग्राहकांना इजी कार पॅकेज देत आहे, जो एक वार्षिक मेन्टेनंस करार आहे. ही ऑफर त्या ग्राहकांसाठी आहे, ज्यांनी यापूर्वीच रेनॉ डस्टर खरेदी केली आहे.

RxE व्हर्जनवर केवळ 20,000 रुपयांचा लॉयल्टी बोनस लागू आहे. यामध्ये तुम्हाला इजी कार पॅकेज मिळणार नाही. 7 सीटर रेनॉ ट्रायबरबाबत बोलायचे झाल्यास, या कारवर ग्राहकांना 50 हजार रुपयांपर्यंतचा फायदा होईल. तसेच ग्राहकांना 10 हजार रुपयांपर्यंतची कॅश बेनेफिट ऑफरही देण्यात आली आहे. यासोबतच 10 हजार रुपये आणि 20 हजार रुपयांच्या एक्सचेंज बेनेफिट ऑफर्सही लागू आहेत. बेस RxR व्हर्जनवर 10,000 रुपयांचा लॉयल्टी बोनस दिला जात आहे.

रेनॉची प्रसिद्ध हॅचबॅक कार क्विडवरही कंपनीने ऑफर दिली आहे. या गाडीवर कंपनीने 45 हजार रुपयांची ऑफर दिली आहे. 20 हजार रुपये रोख, 15 हजार रुपयांची एक्सचेंज ऑफर आणि सिलेक्टेड व्हर्जन्सवर 10 हजार रुपयांचा लॉयल्टी बोनस दिला जात आहे.

संबंधित बातम्या 

Renault ची नवी ऑफर, केवळ 1403 रुपयांच्या हप्त्यांवर रेनॉ क्विड घरी घेऊन जा

‘या’ आहेत भारतातील सर्वात सुरक्षित कार, किंमत 10 लाखांपेक्षा कमी

भारतीयांच्या मनात भरलेली ‘ही’ कार क्रॅश टेस्टमध्ये फेल

(Renault India discounts : Up to Rs 70,000 off on Duster and Triber)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI