Renault ची ‘ही’ कार ठरणार सर्वात स्वस्त?, किंमत बघून थक्क व्हाल

जगप्रसिद्ध असेलेली फ्रान्सची Renault कंपनीसुद्धा किगर (Kiger) नावाची नवी कार बाजारात आणत आहे. (renault kiger car price)

  • Updated On - 10:50 am, Sat, 26 December 20
Renault ची 'ही' कार ठरणार सर्वात स्वस्त?, किंमत बघून थक्क व्हाल

मुंबई : देखभालीसाठी कमी खर्च आणि उत्तम ड्रायव्हिंग एक्सपिरीयन्सच्या अनुभवासाठी सध्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीची सुविधा असणाऱ्या कारची मागणी सध्या वाढली आहे. ग्राहकांचा वाढता कल लक्षात घेता अनेक कंपन्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीची सुविधा असणाऱ्या कारचे उत्पादन करत आहेत. जगप्रसिद्ध असेलेली फ्रान्सची Renault कंपनीसुद्धा किगर (Kiger) नावाची नवी कार बाजारात आणत आहे. (renault new car kiger price will launch in 2021)

सूत्रांच्या माहितीनुसार एसयूव्हीची सुविधा असणारी ही आतापर्यंतची सर्वांत स्वस्त कार असल्याचे सांगण्यात येत आहे. या कारची किंमत 5.50 लाख आहे. याआधी Nissan Magnite या कंपनीची एसयूव्ही असणारी कार नुकतीच लॉन्च झाली होती. या करची किंमत 4.99 लाख रुपये आहे. मिळालेल्या माहितीनुसार 1 जानेवारी 2021 पासून या करची किंमत वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे Renault तयार करत असलेली Kiger या कारची किंमत सर्वात कमी असल्याचे सांगण्यात येत आहे.

Kiger कारचे वैशिष्य

Kiger या कारमध्ये 1 लीटरचे नॅचरल एस्पायर्ड आणि टर्बो पेट्रोल इंजिन असू शकते. या कारचे नॅचरल एस्पायर्ड इंजिन 72ps क्षमतेचे असेल तर 96 Nm चा टॉर्क या कारद्वारे जनरेट केला जाईल. या कारमधील टर्बो इंजिन 100ps पावर आणि 160Nm चा टॉर्क निर्माण करेल. तसेच या कारमध्ये 8 इंच टचस्क्रीन असेलेली इन्फोटेनमेंट सिस्टीमही असेल. तसेच LED प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, क्रूज कंट्रोल, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल, व्हाईस रिकग्नायझेशन तंत्रज्ञान, पूश बटन, स्टर्ट आणि स्टॉप अ‌ॅटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल अशा वेगवेगळ्या सुविधा या कारमध्ये देण्यात येणार आहेत. ही कार 5 लाख रुपयांपासून 9 लाखांपर्यंत मिळू शकेल.

Renault  ची ही नवी कार नक्की कधी लॉन्च होणार याबद्दल निश्चित माहिती मिळालेली नाही. अधिकृतरित्या Renault कंपनीने याबद्दल काही सांगितलेलं नाही. मात्र, आगामी वर्षाच्या सुरुवातीला या कारची लॉन्चिंग होईल असे सांगण्यात येत आहे.

संबंधित बातम्या :

Christmas Discounts विसरा! ‘ही’ कार कंपनी देतेय तब्बल 7 लाखांचा बंपर डिस्काऊंट

नवीन कार घेण्याचा विचार करताय? ‘या’ गोष्टी लक्षात घ्या अन्यथा होऊ शकते नुकसान…

टाटा मोटर्सनेही गाड्यांच्या किंमती वाढवल्या, 1 जानेवारीपासून नव्या किंमती लागू

(renault new car kiger price will launch in 2021)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI