सिद्धार्थ पिठानीसोबत बहिणीच्या वर्तनावर सुशांत नाखुश, रिया चक्रवर्तीकडून व्हाॅट्सअ‍ॅप चॅटचा दाखला

"प्रियंका माझा मित्र सिद्धार्थ पिठानीला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहे" असे सुशांत बोलत असल्याचे रियाने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये दिसत आहे

सिद्धार्थ पिठानीसोबत बहिणीच्या वर्तनावर सुशांत नाखुश, रिया चक्रवर्तीकडून व्हाॅट्सअ‍ॅप चॅटचा दाखला


मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचे गूढ दिवसेंदिवस अधिकच गडद होताना दिसत आहे. सीबीआय आणि ईडीच्या रडारवर असलेली सुशांतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने सुशांतसोबत केलेल्या व्हाॅट्सअ‍ॅप चॅटचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. यामध्ये आपली बहीण प्रियंकाने सिद्धार्थ पिठानीसोबत केलेल्या वर्तनाबद्दल सुशांतने चिंता व्यक्त केल्याचे दिसत आहे. “प्रियंका माझा मित्र आणि फ्लॅटमेट सिद्धार्थ पिठानीला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहे” असे सुशांत बोलत असल्याचे रियाने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये दिसत आहे. (Rhea Chakraborty shares WhatsApp messages with Sushant Singh Rajput)

काय आहे संभाषण?

सुशांत रिया आणि तिचा भाऊ शोविक यांचे कौतुक करत असताना संभाषणाला सुरुवात होते. “तुझे कुटुंब ‘एपिक’ (उत्तम) आहे. सर (रियाचे वडील) किती योग्य आहेत. शोविक दयाळू आहे आणि तू माझी आहेस. तुम्ही माझ्याभोवती असल्याचा मला आनंद आहे. रॉकस्टार असल्याबद्दल चिअर्स मैत्रिणी” असे सुशांत म्हणतो.

पुढच्या मेसेजमध्ये सुशांत म्हणतो, “तू कृपया हसत राहा, हसताना तू खूप छान दिसतेस. मी आता झोपायचा प्रयत्न करेन. माझी इच्छा आहे की मला जमीलासारखे स्वप्न पडावे. हे खूप मस्त असेल ना? बाय”

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

“आपली बहीण सिद्धार्थ पिठानीला नियंत्रित (manipulate) करण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या गोष्टी तू आणि मी सोडून देण्याचा प्रयत्न करत आहोत, त्यावरुन ती victim card खेळत आहे” असा दावाही सुशांतने केल्याचे दिसत आहे.

प्रियंकाला उद्देशून सुशांतने रियाला एक मेसेज पाठवला आहे. “(टू प्रियंका) तू हेच करतेस, इतके लज्जास्पद कृत्य केल्यानंतर ते दडवण्याचा प्रयत्न करतेस. दारुच्या अंमलाखाली गैरवर्तन केलंस आणि आता लक्ष हटवण्यासाठी भोळेपणाचा आव आणतेस” अशा आशयाचे मेसेज सुशांतने केले आहेत.

हेही वाचा : ईडीकडून रियानंतर भाऊ शौविकची चौकशी, बँक खातं ते सुशांतच्या भांडणापर्यंत अनेक प्रश्न

“आपली आई आणि देवाने मला काही शिकवण दिली आहे, त्यानुसार तू गुन्हा केला आहेस. तुझ्या डोळ्यावर अहंकाराची पट्टी बांधली असेल, तर देव तुझे भले करो, कारण मी घाबरत नाही. मी जगात आवश्यक ते बदल घडवण्याचे प्रयत्न करतच राहीन. आता देव आणि निसर्गाला ठरवू दे कोणते कृत्य योग्य आहे” अशा कठोर शब्दात सुशांतने इशारा दिल्याचे दिसत आहे. (Rhea Chakraborty shares WhatsApp messages with Sushant Singh Rajput)

त्यानंतर सिद (सिद्धार्थ पिठानी) ला उद्देशून एक मेसेज सुशांतने रियाला पाठवला आहे. “तिने माझ्या डोळ्यादेखत तुला मारले.” असा उल्लेख केला आहे. सुशांतने आपल्या बहिणीचे कृत्य अत्यंत पापी असल्याचेही म्हटले आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

लिल्लू ते बेबू, सुशांतच्या नोट्समध्ये उल्लेख, रियाकडे सुशांतची खास भेट

सुशांतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृतदेहावर कपडे नव्हते, पोस्टमोर्टम रिपोर्टमध्ये खुलासा

(Rhea Chakraborty shares WhatsApp messages with Sushant Singh Rajput)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI