Sushant Singh Rajput | ईडीकडून रियानंतर भाऊ शौविकची चौकशी, बँक खातं ते सुशांतच्या भांडणापर्यंत अनेक प्रश्न

शौविक चक्रवर्ती या प्रकरणातील संशयित आहे. शौविकच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर झाल्याचा आरोप आहे.

Sushant Singh Rajput | ईडीकडून रियानंतर भाऊ शौविकची चौकशी, बँक खातं ते सुशांतच्या भांडणापर्यंत अनेक प्रश्न

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मनी लाँड्रिंग प्रकरणात आज रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती (Showik Chakraborty Inquiry) याची चौकशी सुरु आहे. शौविक चक्रवर्ती या प्रकरणातील संशयित आहे. शौविकच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर झाल्याचा आरोप आहे. त्याच अनुषंगाने आज त्याची चौकशी झाली (Showik Chakroborty Inquiry).

बिहार पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात रियासोबत तिचं कुटुंबियही संशयाच्या भोवऱ्यात आहे. यात शौविकचंही नाव आहे. शौविक रियाचा सख्खा लहान भाऊ आहे. काल (7 ऑगस्ट) रियाला चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. यावेळी शौविकला बोलावलं नव्हतं. यानंतरही तो आला होता. यावेळी मग ईडी अधिकाऱ्यांनी त्याला ही समन्स दिल. मात्र, त्याची चौकशी केली नव्हती.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

यानंतर शौविकला आज चौकशीसाठी बोलावलं. तो सकाळी साडे अकराच्या सुमारास ईडी कार्यालयात आला. शौविक यावेळी आपल्यासोबत काही कागदपत्रंही घेऊन आला. तेव्हा पासून त्याची चौकशी सुरु आहे.

शौविककडे अनेक मुद्द्यांवर चौकशी सुरु आहे. शौविककडे त्याच्या शिक्षणाबाबत, त्याच्या कुटुंबाबाबत, त्याच्या आर्थिक सोर्सबाबत विचारणा केली जात आहे (Showik Chakroborty Inquiry).

प्रश्न –

1) शौविक तुझी कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे?

2) तुझा आणि तुझ्या कुटुंबाचं, उत्पन्नाचं साधन काय आहे?

3) तुझं कोणत्या बँकेत खातं आहे?

4) तुझ्या कुटुंबाचं कोणत्या बँकेत खातं आहे?

5) रियाबद्दल तुमच्या कुटुंबाचं काय मत आहे?

6) रियाचं तुमच्या कुटुंबासोबत भांडण आहे का?

7) सुशांतबाबत तुमच्या कुटुंबाचं काय मत होतं?

8) सुशांतवरुन तुमच्या कुटुंबात भांडण होत होती का?

9) सुशांतच्या खात्यातील पैसे कुठे गेले?

10) सुशांतच्या पैशाचा तुम्ही कसा व्यवहार केला आहे?

आदी अनेक प्रश्न शौविकला विचारण्यात येत आहेत. शौविककडून रियाबाबतही बरीच माहिती विचारण्यात आली आहे. शौविकने तटस्थपणे ही माहिती दिली आहे. या प्रकरणात आता सोमवारी रिया, तिच्या कुटुंबातील इतर सदस्य आणि सिद्धार्थ पिठाणी यांची ईडीचे अधिकारी चौकशी करणार आहेत.

Showik Chakroborty Inquiry

संबंधित बातम्या :

लिल्लू ते बेबू, सुशांतच्या नोट्समध्ये उल्लेख, रियाकडे सुशांतची खास भेट

ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कागदपत्रे घेऊन पुन्हा कार्यालयात दाखल

Sushant Death Case | रियाचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडाची 9 तास ईडी चौकशी, आता रियाचा नंबर

रियाकडे कोट्यावधींचे दोन फ्लॅट, सुशांतच्या खात्यातून 15 कोटीच्या व्यवहाराचा आरोप, ईडी अ‍ॅक्शन मोडमध्ये

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *