“चहात 4 थेंब वापर, त्याला पिऊ दे, किक बसायला 30-40 मिनिटे दे” रियाच्या कथित व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये ‘ड्रग्ज अँगल’ समोर

जया साहाने रियाला "चहा किंवा पाण्यात 4 थेंब वापर आणि त्याला पिऊ दे... किक बसायला 30-40 मिनिटे दे" असे मेसेज केले होते

चहात 4 थेंब वापर, त्याला पिऊ दे, किक बसायला 30-40 मिनिटे दे रियाच्या कथित व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये 'ड्रग्ज अँगल' समोर
अनिश बेंद्रे

|

Aug 26, 2020 | 10:49 AM

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाला दररोज धक्कादायक वळणं मिळत आहेत. सुशांतची मैत्रीण आणि सीबीआयच्या रडारवर असलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचे जुने व्हॉट्सअ‍ॅप चॅट समोर आले आहेत. यात रियाने ड्रग्जच्या कथित वापराबद्दल बातचीत केल्याचे दिसते. (Rhea Chakraborty Whatsapp Chats allegedly shows her Conversation with Drug Dealers)

रिया चक्रवर्तीच्या मोबाईलवरुन पाठवलेले व्हॉट्सअ‍ॅप मेसेज समोर आले आहेत. ज्यामध्ये रियाने एमडीएमए, गांजा अशा ड्रग्जचा उल्लेख केल्याचे दिसते. जया सहा नावाच्या व्यक्तीने रियाला “चहा किंवा पाण्यात 4 थेंब वापर आणि त्याला पिऊ दे… किक बसायला 30-40 मिनिटे दे” असे मेसेज केले आहेत.

एका कथित चॅटमध्ये रिया ही गौरव आयरा नावाच्या संशयित ड्रग्ज विक्रेत्याशी बोलत आहे. ती म्हणते, “हार्ड ड्रग्जबद्दल बोलायचं तर मी जास्त घेतलेले नाहीत. एकदा एमडीएमए घेण्याचा प्रयत्न केला” या मेसेजनंतर “आपल्याकडे एमडी आहे का?” अशी विचारणा रियाने केली. 8 मार्च 2017 रोजी तिने हा मेसेज केला होता.

दुसर्‍या संभाषणात, रियाच्या फोनमध्ये ‘मिरांडा सुशी’ म्हणून सेव्ह केलेल्या नंबरवरुन (सुशांतचा मदतनीस सॅम्युअल मिरांडा) रियाला मेसेज आला आहे “हाय रिया, स्टफ (माल) जवळजवळ संपला आहे.” त्यानंतर मिरांडा रियाला विचारतो “शोविकच्या (रियाचा भाऊ) मित्राकडून आपण ते घ्यायला पाहिजे का? पण त्याच्याकडे नुसतेच हॅश अँड बड (कमी प्रतीचे ड्रग्ज) आहे.”

यातील सर्वात चकित करणारा संवाद रिया आणि जया साहा नावाच्या व्यक्ती दरम्यान होता. 25 नोव्हेंबर, 2019 रोजी जयाने रियाला “मी तिला श्रुतीशी समन्वय करण्यास सांगितले” असे म्हटले होते. त्यानंतर “चहा किंवा पाण्यात 4 थेंब वापर आणि त्याला पिऊ दे… किक बसायला 30-40 मिनिटे दे” असे मेसेज केले आहेत.

दरम्यान, रियाने तिच्या आयुष्यात कधीही ड्रग्जचे सेवन केले नाही. ती रक्त तपासणीसाठी तयार आहे, असे उत्तर रियाच्या वकिलांनी दिले आहे. मृत्यू प्रकरणात ‘ड्रग्ज अँगल’ उघडकीस आल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) या प्रकरणात चौकशी सुरु करण्याची शक्यता आहे.

सोशल मीडियावर ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर रिया चक्रवर्तीच्या अटकेच्या मागणीसाठी सुशांतचे चाहते सरसावले आहेत. ईडीने चौकशी दरम्यान रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाचे फोन आणि लॅपटॉप जप्त केले आहेत. (Rhea Chakraborty Whatsapp Chats allegedly shows her Conversation with Drug Dealers)

कूपर आणि मुंबई पोलिसांना कारणे दाखवा

सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्तीला शवगृहात प्रवेश दिल्याबद्दल कूपर रुग्णालय आणि मुंबई पोलिसांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. सुशांतच्या पोस्टमार्टमच्या वेळी रुग्णालयात रिया चक्रवर्ती उपस्थित असल्याची व्हिडीओ क्लिप समोर आली. त्यानंतर परवानगीचा प्रश्न उपस्थित करत मुंबई पोलिसांना राज्य मानवाधिकार आयोगाने मंगळवारी कारणे दाखवा नोटीस दिली.

संबंधित बातम्या :

रुग्णवाहिका चालकाला चार वेळा फोन, निर्माता संदीप सिंह सीबीआयच्या रडारवर

रियाकडून सुशांतवर आध्यात्मिक उपचार, सीबीआय पंडित, पुजारी तांत्रिक-मांत्रिकांचीही बाजू तपासणार

(Rhea Chakraborty Whatsapp Chats allegedly shows her Conversation with Drug Dealers)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें