AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबादः काळ्या बाजारात जाणारा 30 टन तांदूळ पकडला, वाहतूक पोलिसांची कारवाई

औरंगाबादः भोकरदनहून सिल्लोडकडे काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणाऱा 30 टन तांदूळ वाहतूक पोलिसांनी पकडला. सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. भोकरदन-सिल्लोड रस्त्यावरील पिंप्री फाट्याजवळ पोलिसांनी हे वाहन पकडले. पोलिसांनी तांदुळाने भरलेला हा ट्रक जप्त करून ग्रामीण पोलीस ठाण्यात आणला. खबऱ्यामार्फत मिळाली माहिती सोमवारी वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक भारत माने, पोलीस कर्मचारी अजरुद्दीन शेख, […]

औरंगाबादः काळ्या बाजारात जाणारा 30 टन तांदूळ पकडला, वाहतूक पोलिसांची कारवाई
औरंगाबाद वाहतूक पोलिसांनी जप्त केलेला तांदूळ ग्रामीण पोलिसांकडे सोपवला
| Edited By: | Updated on: Oct 27, 2021 | 6:36 PM
Share

औरंगाबादः भोकरदनहून सिल्लोडकडे काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणाऱा 30 टन तांदूळ वाहतूक पोलिसांनी पकडला. सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. भोकरदन-सिल्लोड रस्त्यावरील पिंप्री फाट्याजवळ पोलिसांनी हे वाहन पकडले. पोलिसांनी तांदुळाने भरलेला हा ट्रक जप्त करून ग्रामीण पोलीस ठाण्यात आणला.

खबऱ्यामार्फत मिळाली माहिती

सोमवारी वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक भारत माने, पोलीस कर्मचारी अजरुद्दीन शेख, सुरेश मोरे वाहनांवर कारवाई करीत होते. यादरम्यान भोकरदनकडून एक ट्रक तांदूळ भरून काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याची माहिती खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या माहितीवरून पिंप्री फाट्याजवळ सापळा लावला. सदर माहिती मिळालेल्या क्रमांकाच ट्रक येताच पोलिसांनी थांबवला. तपासणी केली असता ट्रक तांदळाने भरलेला असल्याचे समोर आले. हा माल कुठून आणला अशी विचारपूस केली असता ट्रक चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली.

मुख्य सूत्रधाराचा तपास सुरु

दरम्यान हा ट्रक पोलिसांनी जप्त करून ग्रामीण पोलीस ठाण्यात आणला. ट्रकमध्ये 30 टन तांदूळ असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. हा ट्रक कुठून भरून आला, कुठे चालला होता, याचा तपास पोलीस करीत असून यात मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. ग्रामीण पोलिसांनी सदरची माहिती महसूल विभागाला दिली. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद मुंढे यांनी दिली.

जाफराबादेत 9 चोरट्यांचा धुमाकूळ

जालना जिल्ह्यातील जाफराबाद शहरातील आदर्श नगरात डॉ. हनुमय्या मार्ता यांचे कुटुंब राहते. मंगळवारी पहाटे चोरट्यांनी घराचे फाटक उघडून दरवाजा तोडत घरात प्रवेश केला. यावेळी दोन मुली आणि एका महिलेला मारहाण केली. हे दरोडेखोर हिंदी आणि मराठी भाषेत संवाद साधत होते. त्यांच्याकडे टॉमी, गज, रॉड यासारखी घातक अवजारे होती. आरडाओरड केली तर जिवे मारू, अशी धमकी या चोरट्यांनी घरच्यांना दिली होती. दहा मिनिटांच्या थरारात कुटुंब घाबरून गेले. तर त्यांची २५ वर्षांची व्यकंट रमना ही मुलगी चोरांनी केलेल्या मारहाणीत जालना येथील एका रुग्णालयात उपचार घेत आहे. तसेच डॉ. मार्ता यांच्या गुडघ्याला रॉडचा मार लागला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ चोरांचा पाठलाग सुरु केला. पण बाइकवरून फरार होण्यात चोर यशस्वी झाले.

इतर बातम्या

इतिहास काढला तर लक्षात येईल ‘हमाम मे सब नंगे’, जितेंद्र आव्हाडांचा क्रांती रेडकरला सांभाळून बोलण्याचा सल्ला

आता मागं फिरायचं नाही, पुणे ते मुंबई लाँग मार्च काढावा लागेल, मराठा आरक्षणासाठी संभाजी छत्रपती आक्रमक

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.