आता मागं फिरायचं नाही, पुणे ते मुंबई लाँग मार्च काढावा लागेल, मराठा आरक्षणासाठी संभाजी छत्रपती आक्रमक

राज्यसभा खासदार संभाजी छत्रपती यांनी मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांवरुन राज्य आणि केंद्र सरकारला इशारा दिला आहे. जर आरक्षणाच्या मागण्या पूर्ण होत नसतील. जर ते पूर्ण होत नसतील तर पुणे ते मुंबई लाँग मार्च काढावा लागेल, असं त्यांनी म्हटलंय.

आता मागं फिरायचं नाही, पुणे ते मुंबई लाँग मार्च काढावा लागेल, मराठा आरक्षणासाठी संभाजी छत्रपती आक्रमक
संभाजी छत्रपती
Follow us
| Updated on: Oct 27, 2021 | 5:14 PM

सोलापूर: राज्यसभा खासदार संभाजी छत्रपती यांनी मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांवरुन राज्य आणि केंद्र सरकारला इशारा दिला आहे. जर आरक्षणाच्या मागण्या पूर्ण होत नसतील. जर ते पूर्ण होत नसतील तर पुणे ते मुंबई लाँग मार्च काढावा लागेल, असं त्यांनी म्हटलंय. एक पोलीस अधिकारी म्हणाला 2 किलोमीटर अंतर आहे. पण मी म्हटलं असू द्या. आता मागे फिरणार नाही. यापुढे आता पहिला टप्पा म्हणून 35 किलोमीटर चालायच आहे. रोज किलोमीटर वाढवूयात. लोकांमध्ये जाऊयात आपण, छत्रपती लोकांमध्ये राहतात हे दखवुन देऊ, असंही संभाजी छत्रपती म्हणाले.

आरक्षण हवं असल्यास मागासवर्गीय आयोग स्थापन करावा लागेल

सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाज हा मागासलेला नसून पुढारलेला असल्याचे सांगितलं. या निकालानंतर मी शरद पवार, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, बाळासाहेब थोरात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रपती सर्वांची भेट घेतली होतं असं खासदार संभाजी छत्रपती म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं. राजर्षी शाहू महाराजांनी वंचित घटकांना न्याय दिला, शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सर्वांनी न्याय द्यायचा प्रयत्न केला. 1963 पर्यंत मराठा समाजाला इंटरमिडेट क्लास म्हणून केंद्रात आरक्षण मिळत होतं. मात्र, मध्यंतरी काही आयोग निर्माण झाले आणि आरक्षण रद्द झाले.

मुख्यमंत्री आणि समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले तुम्ही पुनर्विचार याचिका दाखल करण्यास सांगितलं. मात्र, सामाजिक मागास सिद्ध होण्यासाठी मागासवर्गीय आयोग निर्माण करावे लागेल असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. राज्य शासन म्हणते की आमच्या हातात काही नाही, केंद्राने 50 टक्क्यांची मर्यादा वाढवा. पण, जर तुम्हाला आयोग स्थापन करता येत नसेल तर किमान कमिटी तर गठीत करा, समजाला मागास असल्याचे सिद्ध करावे लागेल. 70 टक्के मराठा गरीब आहे, हे सिद्ध करावं लागणार आहे, हेच समजवण्याचा प्रयत्न मी राज्य शासनाला करतोय मात्र आठ महिने झाले तरी काहीही निर्णय झालेले नाही.

इंद्रा सहानी केसमुळं आरक्षण उडालं?

केंद्र सरकारचं म्हणणं आहे की ते अधिकर राज्य शासनाला दिले आहेत.इंद्रा सहानी केसमुळे मराठा आरक्षण उडाले असल्याचं संभाजी छत्रपती म्हणाले. असामान्य परिस्थिती निर्माण झाली तर मराठा आरक्षण देता येऊ शकेल, असा इंद्रा सहानी केसमधील निकाल आहे. घटनादुरुस्ती वेळी मी पार्लमेंटमध्ये मला बोलू दिले गेले नाही, मी भांडलो, त्यानंतर माध्यमांसमोर बोललो. पार्लमेंटमध्ये ही टर्म बदलावी आणि मराठा समजासह इतर पटेल, गुर्जर इत्यादी समाजाच्या आरक्षणाच्या मार्ग मोकळा होईल, असं खासदार संभाजी छत्रपती म्हणाले.

ठाकरे सरकारनं त्यांच्या हातातील गोष्टी कराव्यात

राज्य शासनाच्या हातात जे काही आहे ते तरी करावं. सारथीचे प्रश्न, भरती झाले त्यांना नियुक्त्या तर द्याव्यात, असं संभाजी छत्रपती म्हणाले. अ‌ॅटर्नी जनरल कुंभकोणी मला रोज फोन करायचे की आपण असं तसं करू मात्र काही झालंच नाही. ज्या 58 मोर्चाचे आदर्श जगाणे घेतला त्यातून काय मिळालं? शून्य? आरक्षण इतकेच सारथी देखील खूप महत्त्वाची आहे. 22 मुले आयएएस झाले. ती सुरू होणे गरजेचे आहे. आतापर्यंत एका ही वस्तीगृहाचे उदघाटन झाले नाही. आता शाळा- महाविद्यालये सुरू होत आहेत. आधी अजित दादा ऐकत नव्हते. पण आता ते ही मान्य करत आहेत. त्यांचं कौतुक आहे, असं संभाजी छत्रपती म्हणाले.

सगळे मला म्हणतात मी भाजप पुरस्कृत आहेत. काही जण म्हणतात राष्ट्रवादीचे संबंध चांगले, काहीजण काँग्रेस आणि शिवसेना पुरस्कृत पण म्हणतात. पण जर भाजप पुरस्कृत मी असेन तर मला भाजपने पार्लमेंटमध्ये मला बोलू दिले नाही, असंही खासदार संभाजी छत्रपती म्हणाले. जर आरक्षणाच्या मागण्या पूर्ण होत नसतील. राज्य आणि केंद्राचे विषय वेगवेगळे आहे. जर ते पूर्ण होत नसतील तर पुणे ते मुंबई लाँग मार्च काढावं लागेल. इथे त्याची रिअर्सल झाली. काही जण म्हणाले बुलेटवर जाऊयात. पण मी म्हटलं आपल्याला लाँग मार्च काढायचा आहे. त्याची रिअर्सलची सुरुवात सोलापुरातून करूयात, असंही संभाजी छत्रपती म्हणाले.

इतर बातम्या:

जलयुक्त शिवार योजनेला क्लीन चिट नाहीच! राज्य सरकारचं स्पष्टीकरण, नेमकं प्रकरण काय?

MHT CET Result 2021: एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल सांयकाळी 7 वाजता जाहीर होणार, रिझल्ट कुठं पाहायचा?

Sambhaji Chhatrapati active for Maratha Reservation issue said Mumbai to Pune long March organize

Non Stop LIVE Update
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.