AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दु:ख आणि चीड, पडळकरांचं वय नाही तेवढं पवारसाहेबांचं काम : रोहित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी भाजपचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर सडकून टीका केली आहे (Rohit Pawar criticize Gopichand Padalkar).

दु:ख आणि चीड, पडळकरांचं वय नाही तेवढं पवारसाहेबांचं काम : रोहित पवार
| Updated on: Jun 25, 2020 | 1:52 PM
Share

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी भाजपचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर सडकून टीका केली आहे (Rohit Pawar criticize Gopichand Padalkar). गोपीचंद पडळकर यांची टीका ही खालच्या पातळीवरील राजकारण आहे. यामुळे दुःख होतं आणि चीड देखील येते. शरद पवार यांच्या कामाचा जितका अनुभव आहे, तितकं टीका करणाऱ्यांचं वयही नाही, असा सणसणीत टोला रोहित पवार यांनी लगावला. यावेळी त्यांनी इतरही राजकीय स्थितीवर भाष्य केलं. ते टीव्ही 9 मराठीच्या विशेष मुलाखतीत बोलत होते.

रोहित पवार म्हणाले, गोपीचंद पडळकर जे बोलले ते राजकीय वक्त्व्य होतं. त्यांना ज्यांनी आमदार बनवलं त्या भाजपच्या नेत्यानेच पडळकरांना हे चुकीचं असल्याचं सांगितलं. त्यांच्याच नेत्याला हे वक्तव्य चुकीचं वाटलं. त्यांच्याच नेत्याने ते चुकले हे दाखवून दिलं. म्हणूनच आम्ही वेगळं बोलून काय करणार आहोत. शरद पवार मागील 50-55 वर्षांपासून लोकांसाठी काम करत आहेत. ते लोकांच्या मनात आहेत. त्यामुळे ज्या लोकांना काही काम नाही तेच शरद पवार यांच्या बदनामीसाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, शरद पवार यांचं जितकं वर्ष काम आहे इतकं याचं वयही नाही.”

“लोकांच्या मनात मोठं स्थान असलेल्या नेत्याविषयी असं काही बोललं की आपली राजकीय पोळी भाजेल असं काही लोकांना वाटतं. टीव्हीवर किंवा वर्तमान पत्रात येण्यासाठी त्यांचं हे खालच्या पातळीवरील राजकारण आहे. या राजकारणाचा लोकांना काहीही फायदा नाही. म्हणूनच आम्ही सर्वजण अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करत असतो. अशाप्रकारचं खालच्या पातळीवरील राजकारण पाहिलं की आम्हाला दुःख होतं, चिडही येते. आमच्या पिढीला हे असं राजकारण चालणार नाही. आम्हाला सकारात्मक राजकारण हवं जे लोकांच्या हिताचं आहे,” असं रोहित पवार यांनी सांगितलं.

‘निषेध करताना नियमांचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्या’

शरद पवार यांच्याविरोधातील पडळकरांच्या वक्तव्यानंतर राज्यभरात ठिकठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून निषेध केला जात आहे. यावर बोलताना रोहित पवार यांनी राष्ट्र्वादीच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. ते म्हणाले, “पडळकरांबाबत कार्यकर्त्यांना इतकंच आवाहन आहे, की शरद पवार यांच्यावरील टीकेने तुम्ही दुखावला आहात. त्यामुळे तुम्ही एका व्यक्तिगत भावनेतून निषेध करत आहात. अशावेळी कोणत्याही नियमांचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्या. स्वतःची काळजी घ्या. अशा खालच्या पातळीवरील राजकारणाकडे दुर्लक्ष करा.”

संबंधित बातम्या :

‘मजुरी करायला का जुंपता, यासाठी एवढं शिक्षण घेतलंय का?’ तरुणाच्या प्रश्नावर रोहित पवार म्हणतात…

आता पालकांवर भार नको, युवकांनो घराबाहेर पडून मिळेल ते काम स्वीकारा, रोहित पवारांचं आवाहन

सोनू सूदच्या कामाने रोहित पवार भारावले, घरी जाऊन कौतुकाची थाप

संबंधित व्हिडीओ:

Rohit Pawar criticize Gopichand Padalkar

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.