नोकरभरती रद्द नको, वर्षभर किमान वेतनावर सेवेत घ्या, रोहित पवारांची मागणी

सरकारने भरती रद्द न करता एक वर्षासाठी मोफत सेवा/किमान वेतन द्यावे. यामुळे युवांना नोकरी आणि सरकारला मनुष्यबळ मिळेल, असं रोहित पवार म्हणतात. (Rohit Pawar on Recruitment cancellation Decision)

नोकरभरती रद्द नको, वर्षभर किमान वेतनावर सेवेत घ्या, रोहित पवारांची मागणी

मुंबई : सरकारने नोकरभरती रद्द केल्याने अनेक युवा उमेदवार पुढच्या वर्षी वयाच्या निकषातून बाद होतील. त्यामुळे वर्षभर किमान वेतनावर सेवेत घेण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारला केली आहे. (Rohit Pawar on Recruitment cancellation Decision)

‘कोरोनामुळे आलेल्या वित्तीय संकटामुळे सरकारने यंदा नोकरभरती रद्द केली, पण वयाच्या अटीमुळे अनेक युवा ‘एज बार’ होतील. त्यामुळे सरकारने भरती रद्द न करता एक वर्षासाठी मोफत सेवा/किमान वेतन द्यावे. यामुळे युवांना नोकरी आणि सरकारला मनुष्यबळ मिळेल. याला युवा सहकार्य करतील, असा विश्वास रोहित पवारां व्यक्त केला आहे.

‘लॉकडाऊन शिथिल होत असतानाच अनेक कामगार/मजूर स्वगृही जात आहेत. परराज्यातील या कामगारांअभावी उद्योग-व्यवसाय सुरू करण्यात अडचण येऊ शकते. पण हे कामगार परत गेल्याने निर्माण झालेल्या संधीचा फायदा मराठी मुलांनी उठवावा आणि आजच्या संकटात कोणतंही काम कमी दर्जाचं समजू नये’ असा सल्लाही रोहित पवार यांनी तरुणांना दिला आहे. (Rohit Pawar on Recruitment cancellation Decision)

हेही वाचा : नोकरभरती रद्द, चालू कामं बंद, नव्या कामांना परवानगी नाही, यंदा कुणाची बदली नाही, अर्थ खात्याचे मोठे निर्णय

आंतरराष्ट्रीय बाजारात घसरलेल्या तेलाच्या मूलभूत किमतींतील फरकाचा लाभ केंद्र सरकारने लोकांना द्यावा. तर राज्यांनीही आपलं उत्पन्न वाढेल एवढा टॅक्स ठेवून पेट्रोल-डिझेलचे दर कमी करावेत आणि लोकांनाही दिलासा द्यावा. शिवाय दिल्लीप्रमाणे मद्यावरही अधिक टॅक्स आकारण्याबाबत विचार व्हावा, अशी मागणी त्यांनी ट्विटरवरुन केली आहे.

हेही वाचा : एक वर्ष मोफत सेवा घ्या, पण नोकर भरती करा, विनोद पाटील यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

दरम्यान, तरुण वर्गासाठी राज्य सरकारने दुर्देवी निर्णय घेतला आहे. नोकरभरती रद्द करणे याचा अर्थ एक पिढी उद्धवस्त करणे. जोपर्यंत राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारत नाही, तोपर्यंत आम्ही मोफत काम करण्यासाठी तयार आहोत, पण नोकरभरती करा, अशी मागणी मराठा क्रांची मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी केली आहे.

…म्हणून राज्यात नोकरभरती रद्दचा निर्णय

कोरोनाचं संकट गहिरं झाल्याने राज्य सरकारने मोठे आर्थिक निर्णय घेतले आहेत. त्यानुसार राज्यात कुठल्याही प्रकारची नवी नोकरभरती होणार नाही. तसंच यावर्षी कुठल्याही कर्मचाऱ्याची बदली करण्यात येणार नाही. इतकंच नाही तर सध्या सुरु असलेली सर्व कामं स्थगित करण्याचे आदेश अर्थखात्याने दिले आहेत. कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने अजित पवार यांच्या अर्थखात्याने कडक पावलं उचलली आहेत. (Rohit Pawar on Recruitment cancellation Decision)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI