मित्रता टिकवतो म्हणजे आम्ही कमजोर नाही, लडाख सीमेवरील भारतीय सैन्याच्या शौर्यानंतर भागवतांचा शत्रूराष्ट्रांना इशारा

'आम्ही मित्रता टिकवतो म्हणून आम्हाला कमजोर समजू नका', असा इशारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत यांनी भारताच्या शत्रूराष्ट्रांना दिला आहे.

मित्रता टिकवतो म्हणजे आम्ही कमजोर नाही, लडाख सीमेवरील भारतीय सैन्याच्या शौर्यानंतर भागवतांचा शत्रूराष्ट्रांना इशारा
Follow us
| Updated on: Oct 25, 2020 | 9:31 AM

नागपूर : ‘आम्ही मित्रता टिकवतो म्हणून आम्हाला कमजोर समजू नका’, असा इशारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत यांनी भारताच्या शेजारील राष्ट्रांना दिला आहे. यावेळी भागवतांचा रोख प्रामुख्याने चीनकडे होता. राष्ट्रीय स्वयंसेवक सघाच्या दसरा मेळाव्यानिमित्त नागपूर येथे भागवत बोलत होते. (RSS VijayaDashmi : Don’t underestimate us as we maintain friendship: Mohab Bhagwat’s warning to China)

भागवत यावेळी म्हणाले की, कोरोनाची निर्मिती चीनमध्ये झाल्याची शंका आहे. पण या काळात चीनने आपल्या सीमेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्यासोबतच अन्य देशांशीही चीनने युद्धजन्य स्थिती निर्माण केली आहे. तो त्यांचा स्वभाव आहे.

भागवत म्हणाले की, चीनने युद्धजन्य परिस्थिती निर्माण केली असली तरी लडाखमध्ये भारतीय सैन्यानं चीनला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे सामरिक आणि आर्थिक बाबींमध्ये चीनला जोरदार धक्का बसला आहे. अन्य देशांनीही चीनला फैलावर घेतलं आहे. चीनचा विस्तारवाद लक्षात घेता तो पुढे काय करेल हे माहीत नाही. त्यामुळे सामरिक, आर्थिक, औद्योगिक बाबींमध्ये आपण सक्षम होणं गरजेचं आहे.

भारताने नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका या शेजारील राष्ट्रांशी संबंध सुधारण्याची, मित्रता टिकवण्याची गरज आहे. आपल्यात मतभेद आहे, मतभेद हो होत असतात. ते दूर करुन चीनला टक्कर द्यायची असेल तर शेजारी राष्ट्रांशी संबंध चांगले ठेवणं गरजेचं आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव आज नागपुरात पार पडतो आहे. यंदाच्या विजयादशमीला पहिल्यांदाच स्वयंसेवकांच्या कवायती नाही. त्यामुळे आरएसएसच्या पारंपरिक दसरा सोहळा यंदा खंडित झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा संघाचा स्थापना दिवस साधेपणाने आणि कोरोनाच्या नियमांचं पालन करुन साजरा केला जात आहे. आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सकाळी शस्त्रपूजन केलं, त्यानंतर उत्सवाला सुरुवात झाली.

कोरोनामुळं यंदाचा विजयादशमी उत्सव हा खुल्या मैदानात न होता सभागृहात होत आहे. नागपुरातील हेडगेवार सभागृहात हा उत्सव पार पडत आहे. त्यामुळे यंदा कुठलेही प्रात्यक्षिक झाले नाहीत. दरवर्षी या कार्यक्रमाला नागरिक आणि निमंत्रित मोठ्या संख्येनं सहभागी होतात. मात्र, यावर्षी फक्त 50 स्वयंसेवकांच्या उपस्थितीत हा उत्सव पार पडत आहे. प्रमुख अतिथी म्हणून कुणालाही आमंत्रित करण्यात आलेलं नाही.

संबंधित बातम्या

RSS Vijayadashami Utsav | कोरोनामुळे संपूर्ण समाज एकरुप झाला : मोहन भागवत

शिवसेनेचा दसरा मेळावा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात, 50 जणांच्या उपस्थितीत सोहळा

(RSS VijayaDashmi : Don’t underestimate us as we maintain friendship: Mohab Bhagwat’s warning to China)

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.