Corona Vaccine | रशियाच्या राष्ट्रपतींनी स्वत:च्या मुलीलाच कोरोना लस टोचली, अमेरिका-ब्रिटनला लसीवर शंका

रशियाचे सर्वेसर्वा पुतीन यांच्या मुलीला सुद्धा कोरोनाची लस दिली गेली आहे. पाश्चिमात्य देश रशियातल्या कोरोना लसीवर शंका व्यक्त करत आहेत.

Corona Vaccine | रशियाच्या राष्ट्रपतींनी स्वत:च्या मुलीलाच कोरोना लस टोचली, अमेरिका-ब्रिटनला लसीवर शंका
Nupur Chilkulwar

|

Aug 11, 2020 | 10:42 PM

मुंबई : रशियाने ‘कोरोना’वर पहिली लस शोधल्याचा दावा केला आहे (Russia Corona Virus Vaccine). ‘कोविड-19’वरील लसीची नोंदणी करणारा रशिया हा जगातील पहिला देश ठरला आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी यासंदर्भात घोषणा केली. त्यानंतर याबाबत जगभरातून अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. एकीकडे पाश्चिमात्य देशांनी रशियाच्या कोरोना लसीवर शंका व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे, रशियाकडे अनेक देशांनी कोरोनावरील लसीची मागणी केली आहे (Russia Corona Virus Vaccine).

पुतीन यांच्या मुलीला कोरोनाची लस दिली

रशियाचे सर्वेसर्वा पुतीन यांच्या मुलीला सुद्धा कोरोनाची लस दिली गेली आहे. पाश्चिमात्य देश रशियातल्या कोरोना लसीवर शंका व्यक्त करत आहेत. त्यामुळे स्वतःच्या मुलीला लस टोचून पुतीन यांनी त्या देशांना आणि रशियातल्या जनतेलाही लस सुरक्षित असल्याचा संदेश दिला. उद्या रशियात कोरोनाच्या लसीची नोंदणी होत आहे. त्यानंतर लसीचं उत्पादन सुरु होऊन ऑक्टोबर महिन्यापासून लोकांना लस दिली जाणार आहे.

फिलीपाईन्सचा रशियाच्या लसीवर विश्वास

अमेरिका-ब्रिटनला रशियाची लसीवर शंका असली तरी फिलीपाईन्सनं मात्र रशियाच्या लसीवर विश्वास व्यक्त केला आहे. फिलीपाईन्सचे राष्ट्रपती रोड्रिगो यांनी स्वतःला लस टोचून घेण्याची तयारी दाखवली. “फिलीपाईन्सच्या लोकांना विश्वास बसावा, यासाठी मी स्वतः ती लस आधी टोचून घेईल”, असं फिलीपाईन्सचे राष्ट्रपती म्हणाले आहेत (Russia Corona Virus Vaccine).

25 देशांकडून रशियाकडे लसीची मागणी

दरम्यान, रशियाकडून तब्बल 25 देशांनी लसीची मागणी केली. एकूण 1 कोटी कोरोना लसीचे डोस रशियात बुक झाल्याची माहिती आहे. मात्र, सुरुवातीचा एक महिना रशिया त्यांच्या जनतेसाठी लसीचं उत्पादन करेल. त्यानंतर इतर देशांना कोरोनाची लस दिली जाईल, असं रशियाकडून सांगण्यात येत आहे.

न्यूझीलंडमध्ये 102 दिवसांनंतर कोरोनाचे रुग्ण सापडले

न्यूझीलंडमध्ये 102 दिवसानंतर कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. एकाच कुटुंबातल्या 3 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. खुद्द न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डन यांनी याची माहिती दिली. मात्र, फक्त तीनच लोक सापडले, तरी सुद्धा न्यूझीलंडमधलं ऑकलँड हे शहर पुढचे 3 दिवस लॉकडाऊन केलं जाणार आहे.

Russia Corona Virus Vaccine

संबंधित बातम्या : 

रशियातील कोरोना लसीच्या चाचणीचे तिन्ही टप्पे पूर्ण, जगात कुठे काय घडतयं?

कोरोनाचे निदान 30 मिनिटात, भारत-इस्रायलचे एकत्रित संशोधन सुरु, फोनवर आवाज ऐकूनही तपासणी

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें