AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कृषीमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून महायुतीचा नेता आक्रमक; थेट सरकारला सुनावलं

कर्जमाफीसंदर्भात प्रश्न विचारलेल्या शेतकऱ्यावर कृषीमंत्री चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं होतं. यावर आता सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

कृषीमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्यावरून महायुतीचा नेता आक्रमक; थेट सरकारला सुनावलं
| Updated on: Apr 05, 2025 | 4:31 PM
Share

आमचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, असं महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी सांगितलं होतं. त्यानंतर विधानसभेत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. या निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवारांचा तब्बल 232 जगांवर विजय झाला. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात महायुतीची सत्ता आली. आता सरकार कधी कर्जमाफी देणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे. मात्र या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार की नाही मिळणार? यावरून आता संभ्रम निर्माण होताना दिसत आहे.

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी एका शेतकऱ्यानं त्यांना कर्जमाफीबद्दल प्रश्न विचारला, प्रश्न ऐकताच ते चांगलेच संतापले, त्यांनी उलट शेतकऱ्यांनाच सुनावलं आहे. पाच-दहा वर्ष कर्जमाफीची वाट पाहता. तोपर्यंत कर्ज भरत नाही, कर्जाच्या पैशांमधून लग्न, साखरपुडा करता असं माणिकराव कोकाटे यांनी या शेतकऱ्यांना सुनावलं आहे. दरम्यान माणिकराव कोकाटे यांच्या या वक्तव्यावर आता आमदार सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले खोत?  

राज्याचे कृषीमंत्री यांनी ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांबाबत विधान केलं ते योग्य आहे असं मला वाटत नाही. परंतु त्यांचा बोलण्याचा हेतू वेगळा असू शकतो, कृषीमंत्री झाल्यानंतर त्यांचं काम पाहिलं तर समाधानकारक आहे. या राज्यातील शेतकऱ्यांचं कर्जमाफ केलं पाहिजे.  याचं कारण शेतकऱ्याचं कर्ज हे सरकारच्या धोरणामुळे झालेलं आहे, सरकारचं धोरण हे शेतकऱ्याचं मरण ठरलेलं आहे, असं यावेळी बोलताना सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, खऱ्या अर्थाने शेतकरी विरोधी जे कायदे आहेत ते आपल्याला रद्द करावे लागतील, शेतमालाला चांगला भाव मिळेल या संदर्भामध्ये धोरण आखावे लागतील. आणि जोपर्यंत आपण शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवेल असं धोरण आखणार नाही. तोपर्यंत शेतकरी विरोधी कायदे हटणार नाहीत. तोपर्यंत शेतकरी हा कर्जबाजारीच राहणार आहे.  शेतकऱ्यांच्या अपेक्षा आपण लक्षात घेतल्या पाहिजेत, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा