कॉस्ट्यूम, मेकअपचे कमीत कमी शेअरिंग, चित्रपट आणि मालिकांच्या चित्रीकरणासाठी गाईडलाईन्स काय?

केंद्राने चित्रपट आणि टीव्ही मालिकांच्या चित्रीकरण सुरु करण्यास परवानगी दिली (Guidelines For television and movie Production Industry) आहे.

कॉस्ट्यूम, मेकअपचे कमीत कमी शेअरिंग, चित्रपट आणि मालिकांच्या चित्रीकरणासाठी गाईडलाईन्स काय?

नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये टप्प्याटप्प्याने शिथिलता आणली जात आहे. त्याचाच भाग म्हणून केंद्राने चित्रपट आणि टीव्ही मालिकांच्या चित्रीकरण सुरु करण्यास परवानगी दिली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावेडकर यांनी याबाबतची माहिती दिली. (Guidelines For television and movie Production Industry)

चित्रपट आणि टीव्ही मालिकांच्या चित्रीकरणाची आजपासून देशामध्ये पुन्हा सुरुवात होत आहे. यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे जावडेकरांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर केंद्राकडून काही गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत.

यानुसार चित्रपट आणि टीव्ही मालिकांचे चित्रीकरण करणाऱ्या सर्व लोकांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे अनिर्वाय असणार आहे. तसेच मास्क घालणेही गरजेचे असणार आहे. केवळ कॅमेऱ्यासमोरील व्यक्तींना मास्क न घालण्याची परवानगी देण्यात आली आहे.

त्यासोबतच शूटिंगचे ठिकाण किंवा त्यासंबंधित इतर जागा सॅनिटायझेशन करणं गरजेचे आहे. तसेच जास्त गर्दी करु नये, असे आदेश दिले आहेत. त्याशिवाय हेअर स्टायलिस्ट, मेकअप आर्टिस्ट या लोकांना पीपीई किट घालणे गरजेचे असणार आहे. तसेच प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अॅप असणेही बंधनकारक आहे.

चित्रपट आणि टीव्ही मालिकांच्या चित्रीकरणासाठी केंद्राच्या गाईडलाईन्स

 • कॅमेरासमोरील कलाकार वगळता इतर सर्वांना मास्क घालणे अनिवार्य
 • प्रत्येक ठिकाणी  कमीत कमी 6 फूट अंतर राखणे बंधनकारक
 • मेकअप आर्टिस्ट, हेअर स्टायलिस्टला पीपीई किट घालणे गरजेचे
 • विग, कॉस्ट्यूम आणि मेकअप यांची शेअरिंग कमीत कमी करा.
 • शेअर होणाऱ्या गोष्टींचा वापर करताना ग्लोव्हज घालणे गरजेचे
 • माईकचे डायफ्रामसोबत सरळ संपर्क करु नये.
 • प्रॉप्सचा वापर कमीत कमी करावा. त्यानंतर ते सॅनिटाईज करा.
 • कमीत कमी व्यक्तींमध्ये शूटींग करावं.
 • आऊटडोअर शूटिंग करताना स्थानिक प्रशासनाची परवानगी घेणे  गरजेचे
 • शूटिंगदरम्यान entry आणि exit करण्यास वेगवेगळी जागा असावी.
  (Guidelines For television and movie Production Industry)

संबंधित बातम्या :

सामान आणि प्रवासी वाहतुकीवरील निर्बंध काढण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करु : अनिल देशमुख

आधी बोगस बियाणे, आता पिकांवर रोग, राज्यातील कृषी खातं झोपलं आहे का?, बच्चू कडूंचा सरकारला सवाल

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI