आयपीएलच्या धर्तीवर श्रीलंकेत प्रीमिअर लीग, सलमान-सोहेलकडून ‘क्रिकेट’ संघाची खरेदी!

सोहेल खानने आयपीएलच्या धर्तीवर सुरू झालेल्या श्रीलंका प्रीमियर लीगमध्ये एका टीमची फ्रँचायझी खरेदी केली आहे.

आयपीएलच्या धर्तीवर श्रीलंकेत प्रीमिअर लीग, सलमान-सोहेलकडून 'क्रिकेट' संघाची खरेदी!
फोर्ब्स इंडिया 2019 च्या यादीत सलमान खानला तिसरं स्थान मिळालं आहे. त्याची वार्षिक कमाई 229.25 कोटी रुपये आहे.

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman khan) याच्या धाकटा भाऊ सोहेल खानने (sohail khan) आयपीएलच्या धर्तीवर सुरू झालेल्या श्रीलंका प्रीमियर लीगमध्ये एका टीमची फ्रँचायझी खरेदी केली आहे. त्यांने कँडी टस्कर्स नावाची टीम खरेदी केली आहे. ही गुंतवणूक सोहेल खान इंटरनॅशनल एलएलपीच्या माध्यमातून झाल्याचे सांगण्यात येत आहे.

बॉलिवूड सेलिब्रिटींना खेळामध्ये नेहमीच रस असतो. मग ते आयपीएलमध्ये क्रिकेट संघ खरेदी करणे असो किंवा देशातील फुटबॉलचा प्रचार करणे. आयपीएलच्या धर्तीवर आता श्रीलंकेत क्रिकेट लीग सुरू होणार आहे. एकूण पाच संघ त्या स्पर्धेत भाग घेत आहेत. सोहेल खानच्या म्हणण्यानुसार, सलमान खान सर्व सामने पाहण्यासाठी स्टेडियममध्ये हजर असणार आहे. या नव्या क्रिकेट लीगबद्दल तो खूप उत्सुक आहे. (Salman khan and sohail khan owned team in sri lankan premier league)

ख्रिस गेल संघात सहभागी होणार!

वेस्ट इंडिज संघातील दिग्गज खेळाडू ख्रिस गेलला सलमान खानच्या या संघात स्थान मिळालं आहे. क्रिकेट प्रेमी त्यांच्या लांब षटकारांची आतुरतेने वाट पाहत आहेत. सोहेल खानच्या टिममध्ये ख्रिस गेल महत्त्वाचा भाग असणार आहे. ख्रिस गेल सोहेल खानच्या दृष्टीने संघाचा खरा मालक आहे. तसे, कँडी टस्करच्या संघात आणखी बडे खेळाडू दिसणार आहेत. या लीगमध्ये लियाम प्लंकेट, वहाब रियाज, कुसल मेंडिस आणि नुवान प्रदीपसारखे क्रिकेटपटू आपले नशीब आजमावणार आहेत.(Salman khan and sohail khan owned team in sri lankan premier league)

कोरोनामुळे यंदा आयपीएल दुबई येथे सुरू आहे. 13 व्या (IPL 2020) मोसमात अनेक युवा खेळाडू दमदार कामगिरी करत आहेत. तर निवृत्त खेळाडू विश्लेषण तसेच समालोचन करत आहेत. या सर्व सामन्यात युवा खेळाडूंनी आपल्या कामगिरीने सर्वांच्याच मनावर मोहिनी घातली आहे. आता सामने रंगताना दिसत आहेत.

संबंधित बातम्या : 

यशराज फिल्म्स, सलमान खानने अनेकांना उद्ध्वस्त केलं, सुशांतच्या आत्महत्येची चौकशी करा : दबंगच्या दिग्दर्शकाची मागणी

Sushant Singh Rajput Suicide | सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सलमान, एकता, करण, भन्साळीविरोधात तक्रार

अभिनव कश्यपवर कायदेशीर कारवाई करणार, सलमानवरील आरोपांनंतर अरबाजचा इशारा

(salman khan and sohail khan owned team in sri lankan premier league)

Published On - 4:20 pm, Wed, 21 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI