संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांना पुण्यात जिल्हाबंदी

कोरेगाव भीमामध्ये उसळलेल्या हिंसाचाराप्रकरणी 2018 मध्ये ज्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते, त्या सर्वांना जिल्हाबंदी करण्यात आली आहे.

संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांना पुण्यात जिल्हाबंदी

पुणे : ‘शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान’चे संभाजी भिडे आणि ‘हिंदू एकता आघाडी’चे मिलिंद एकबोटे यांना पुण्यात चार दिवसांची जिल्हाबंदी (Sambhaji Bhide no entry in Pune) करण्यात येणार आहे. कोरेगाव भीमामध्ये एक जानेवारीला होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन समारंभाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. या दिवशी सर्व राजकीय आणि सामाजिक संघटनांना कोरेगाव भीमामध्ये सभा घेण्यास परवानगी देण्याचं ठरवण्यात आलं आहे.

एकबोटे आणि भिंडेंसह एकूण 163 आरोपींना जिल्हाबंदी करण्यात आली आहे. कोरेगाव भीमामध्ये उसळलेल्या हिंसाचाराप्रकरणी 2018 मध्ये ज्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते, त्या सर्वांना जिल्हाबंदी करण्यात आली आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे पोलिसांनी यासंबंधीचे आदेश देण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात या कार्यक्रमाच्या तयारीच्या निमित्ताने काल बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत भिडे आणि एकबोटे यांना जिल्हाबंदी करण्याचा निर्णय झाल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.

सत्तालोभी आनंदीबाईंनी रघुनाथदादांची बुद्धी भ्रष्ट केली, शिवसेना नगरसेवकाचा अमृता फडणवीसांवर पलटवार

नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशासनाने नियोजन केलं आहे. कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी विविध पक्ष, संस्था, संघटनांचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं, असं आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केलं.

टँकरद्वारे पिण्याचे मुबलक पाणी, फिरते स्वच्छतागृह, एसटी महामंडळ आणि पीएमपीएल बसची सोय, आरोग्य विभागाच्या वतीने रुग्णवाहिका, तसंच पुरेसा औषधसाठा तयार ठेवण्यात येत आहे. बांधकाम विभागाच्या वतीने या परिसराचे सुशोभीकरण, रस्ते दुरुस्ती, बांधकाम दुरुस्ती, सीसीटीव्ही कॅमेरे, वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात येत आहे.

Sambhaji Bhide no entry in Pune

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI