मंदिरात चप्पल घालून गेल्याने वाद, दोन गटात तुफान हाणामारी, गोपीचंद पडळकरांच्या भावावर गुन्हा

याप्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर यांचे भाऊ ब्रम्हानंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Sangli two group fight for some reason)

मंदिरात चप्पल घालून गेल्याने वाद, दोन गटात तुफान हाणामारी,  गोपीचंद पडळकरांच्या भावावर गुन्हा

सांगली : मंदिरात चप्पल घालून का गेला या कारणामुळे दोन गटात तुफान मारामारी झाली आहे. सांगलीतील मसाळवाडी गावात ही घटना घडली आहे. याप्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर यांचे भाऊ ब्रम्हानंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Sangli two group fight for some reason)

मिळालेल्या माहितीनुसार, मसाळवाडीतील एका मंदिरात काही जणांनी चप्पल घालून प्रवेश केला. यानंतर या दोन्ही गटातील वाद विकोपाला गेला होता. या घटनेनंतर सांगलीतील दोन गटात तुंबळ हाणामारी पाहायला मिळाली. यात दोन्ही गटांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच यावेळी आजूबाजूला गाड्यांच्या काचाही फोडल्या आहेत. या हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

याप्रकरणी आटपाडी पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही गटातील 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात आमदार गोपीचंद पडळकर यांचे भाऊ ब्रम्हानंद पडळकर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ब्रम्हानंद पडळकर हे जिल्हा परिषदेचे माजी सभापती आहेत.

दरम्यान मंदिरात चप्पल घालण्यावरुनच ही हाणामारी झाली की याचे काही इतर कारण होते, याचा तपास पोलीस करत आहे. (Sangli two group fight for some reason)

संबंधित बातम्या : 

मुंबई पोलिसांच्या कारवाईला सलाम, अपहरण झालेल्या 4 महिन्यांच्या बाळाची तेलंगणातून सुटका

पत्नीच्या मृत्यूनंतर पतीचीही रेल्वेखाली आत्महत्या, फेसबुक लाईव्ह करत जगाचा निरोप

Published On - 9:30 am, Wed, 18 November 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI