मुंबई : “शेठजींच्या पक्षाचे प्रवक्ते अन्वय नाईक यांच्या आत्महत्येबाबत बोलत नाहीत. मराठी भगिनीचं कुंकू पुसलं गेलं त्याबाबत बोलत नाहीत. मात्र गुन्हेगाराला भेटायला तुरुंगात जातात. अर्णव यांचा कोण लागतो?”, असा जळजळीत सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना विचारला. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आज राऊतांनी माध्यमांशी बोलताना त्यांनी हे आरोप फेटाळून लावत सोमय्या तसंच भाजप नेत्यांवर टीकेची तोफ डागली. (Sanjay Raut Attacked Bjp over Arnab Goswami)