संजय राऊतांची आधी दानवेंसोबत चर्चा, आता फडणवीसांसोबत गुप्त भेट

शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. पण बरोबरच आठवडाभरापूर्वीच त्यांनी भाजप नेते आणि मंत्री रावसाहेब दानवे यांचीही भेट घेतली होती. (Sanjay Raut Raosaheb Danve Meeting)

संजय राऊतांची आधी दानवेंसोबत चर्चा, आता फडणवीसांसोबत गुप्त भेट

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची आज (26 सप्टेंबर) दुपारी गुप्त भेट झाली. मुंबईतल्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये ही भेट झाली. याअगोदर बरोबर आठवड्याभरापूर्वी (18 सप्टेंबर) भाजप नेते आणि केंद्रिय मंत्री रावसाहेब दानवे यांनी नवी दिल्लीतल्या संजय राऊत यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली होती. दानवे-राऊत भेटीनंतर आज फडणवीस-राऊत भेट झाल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना सुरुवात झाली आहे. (Sanjay Raut Raosaheb Danve Meeting on September 18)

रावसाहेब दानवे यांनी संजय राऊत यांची भेट घेण्याअगोदर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. पवारांसोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी संजय राऊत यांची भेट घेतली. त्या दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. राष्ट्रवादी-शिवसेना-भाजप नेत्यांमध्ये होत असलेल्या भेटी आणि चर्चांमुळे महाराष्ट्रात नवीन राजकीय समीकरण उदयाला येणार का? अशा चर्चा यानंतर राजकीय वर्तुळात रंगल्या.

रावसाहेब दानवे यांनी 18 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतल्या संजय राऊत यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली होती. “संजय राऊत यांची भेट घेण्यापाठीमागे कोणतंही राजकीय कारण नाही. महाराष्ट्रातल्या कोरोना परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी मी संजय राऊत यांची भेट घेतली”, असं दानवे यांनी सांगितलं होतं.

दानवेंनी राऊतांची भेट घेण्याअगोदर पवारांची घेतली होती भेट

संजय राऊत यांना भेटण्यापूर्वी दानवेंनी शरद पवार यांची भेट घेतली होती. नवी दिल्लीतल्या पवारांच्या निवासस्थानी ही भेट पार पडली होती. “शरद पवार राज्यातील ज्येष्ठ आणि जाणकार नेते आहेत. कधीही काही अडचण आल्यास आम्ही चर्चा करतो. साखर कारखान्यांच्या समस्यांबदद्दल अनेकदा मी पवारसाहेबांशी बोलतो. या महिन्यात पवारसाहेबांनी मला तीन फोन केले. साखर प्रश्नावर चर्चा करूयात, असं ते मला म्हटलं. त्यामुळे आज (18 सप्टेंबर) ही भेट पार पडली, असं त्यांनी सांगितलं होतं.

रावसाहेब दानवे- संजय राऊत भेट

“संजय राऊत यांची भेट घेण्यापाठीमागे कोणतंही राजकीय कारण नाही. महाराष्ट्रातल्या कोरोना परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी मी संजय राऊत यांची भेट घेतली”, असं दानवे यांनी सांगितलं होतं.

संबंधित बातम्या

EXCLUSIVE : संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ?

सेना-भाजप खूप दूर, देवेंद्र फडणवीस उद्या अजित पवारांनाही भेटू शकतात : सुधीर मुनगंटीवार

Published On - 7:29 pm, Sat, 26 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI