साताऱ्यातील दहा महिन्यांच्या बाळाच्या अपहरण-हत्येचे गूढ उकलले

घरापासून काही अंतरावर असलेल्या विहिरीत काल (गुरुवारी) दहा महिन्यांच्या ओमकारचा मृतदेह सापडला होता

साताऱ्यातील दहा महिन्यांच्या बाळाच्या अपहरण-हत्येचे गूढ उकलले

सातारा : दहा महिन्यांच्या बाळाच्या अपहरण आणि हत्या प्रकरणाचे गूढ उकलण्यात पोलिसांना अवघ्या काही तासात यश आले आहे. एकतर्फी प्रेमातून बाळाची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्रिंबक दत्तात्रय भगत यांच्या दहा महिन्यांच्या मुलाचे मंगळवारी संध्याकाळी अपहरण झाले होते. (Satara Baby Kidnap and Murder mystery solved)

दहा महिन्यांच्या ओमकार भगतचे अपहरण करुन, विहिरीत फेकून त्याची हत्या केल्या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. एकतर्फी प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

ओमकारचे अपहरण झाल्यानंतर साताऱ्यातील लोणंद पोलिसांसह स्थानिक ग्रामस्थ बाळाचा कसून शोध घेत होते. मात्र घरापासून काही अंतरावर असलेल्या विहिरीत काल (गुरुवारी) बाळाचा मृतदेह सापडल्यानंतर हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकं काय झालं?

त्रिंबक दत्तात्रय भगत यांच्या दहा महिन्यांच्या मुलाचे मंगळवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अपहरण झाले. भगत आपल्या कुटुंबासह सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात असलेल्या काळज गावात राहतात. चार मुलींच्या पाठीवर झालेला ओमकार हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता.

भगत कुटुंबीय शेतात कामासाठी गेल्याने घरात कोणीच नव्हते. या संधीचा फायदा घेत अज्ञात व्यक्ती घरात शिरली आणि घरात झोपलेल्या दहा महिन्यांच्या चिमुकल्या ओमकारचे अपहरण केले.

त्रिंबक भगत यांच्या मोठ्या मुलीने हा प्रकार पाहिला आणि आरडाओरडा केला. मात्र तोपर्यंत अपहरणकर्ता बाळाला घेऊन पसार झाला. अपहरणकर्त्याचे वय अंदाजे 22 ते 25 वर्षे असल्याचे सुरुवातीला समोर आले होते. अपहरणाच्या वेळी त्याने अंगात घातलेला काळा शर्ट आणि जीन्स, तर त्याच्यासोबत असणाऱ्या महिलेने गुलाबी ड्रेस घातला होता. या माहितीच्या आधारे पोलिस त्यांचा शोध घेत होते. अपहरणानंतर दोघे दुचाकीवरुन पसार झाल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. (Satara Baby Kidnap and Murder mystery solved)

संबंधित बातम्या :

साताऱ्यात घरात झोपलेल्या 8 महिन्यांच्या बाळाचे अपहरण, दुचाकीवरुन आलेल्या जोडप्यावर संशय

बायकोशी भांडण, जिलेटीनची कांडी तोंडात पकडून स्फोट, डोक्याच्या चिंधड्या

(Satara Baby Kidnap and Murder mystery solved)

Published On - 6:39 pm, Fri, 2 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI