सातारा जिल्ह्याची धाकधूक वाढली, बारा तासात 58 नवे कोरोनाग्रस्त

सातारा जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 394 झाली आहे. (Satara Corona Patients Increased heavily within 12 hours)

सातारा जिल्ह्याची धाकधूक वाढली, बारा तासात 58 नवे कोरोनाग्रस्त
Follow us
| Updated on: May 27, 2020 | 8:29 AM

सातारा : सातारा जिल्ह्यात तब्बल 52 जणांच्या ‘कोरोना’ चाचणीचे अहवाल आज सकाळी (27 मे) पॉझिटिव्ह आल्याने धाकधूक वाढली आहे. तर दोघा कोरोनाबाधित रुग्णांना प्राण गमवावे लागले. गेल्या बारा तासात सापडलेल्या नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 58 झाली आहे. (Satara Corona Patients Increased heavily within 12 hours)

सातारा जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या चारशेच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. गेल्या 12 तासात एकूण 58 रुग्ण वाढल्यामुळे जिल्ह्याची चिंता वाढली आहे. सातारा जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 394 झाली आहे.

काल रात्री नऊ वाजता 6 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. यामध्ये एक रुग्ण ‘सारी’ या आजारानेही त्रस्त होता. हे सर्व रुग्ण  कराड, पाटण तालुक्यातील रहिवासी आहेत. त्यानंतर आज सकाळी आणखी 52 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

दरम्यान, वाई तालुक्यातील आसले येथील 67 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर पाटण तालुक्यातील जांभेकरवाडी येथील 70 वर्षीय व्यक्तीलाही कोरोनाच्या संसर्गाने प्राण गमवावे लागले. सातारा जिल्ह्यात आतापर्यंत 11 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सातारा जिल्ह्यात सध्या 255 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 126 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडीकर यांनी यासंदर्भात माहिती दिली.

राज्यात कालच्या दिवसात 2091 नवे ‘कोरोना’ रुग्ण आढळले. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 54 हजार 758 वर पोहोचला आहे. तर काल दिवसभरात आतापर्यंतच्या सर्वाधिक म्हणजे 97 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबळींची संख्या 1792 वर पोहोचली आहे. काल 1168 रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत डिस्चार्ज मिळालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 16 हजार 954 इतकी झाली आहे. सध्या 36 हजार 4 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

(Satara Corona Patients Increased heavily within 12 hours)

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.