AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनावरील लस संशोधनात कराडच्या कृष्णा हॉस्पिटलचा सहभाग

वैद्यकीय चाचण्यांसाठी निवड करण्यात आलेल्या भारतातील 40 वैद्यकीय संशोधन केंद्रांमध्ये कराडच्या कृष्णा हॉस्पिटलचा समावेश आहे. (Satara Karad Krishna Hospital in Corona Vaccine Research Project)

कोरोनावरील लस संशोधनात कराडच्या कृष्णा हॉस्पिटलचा सहभाग
| Updated on: May 12, 2020 | 9:14 AM
Share

सातारा : ‘कोरोना’वरील लस संशोधन प्रकल्पात साताऱ्यातील कृष्णा हॉस्पिटललाही सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. लसीच्या वैद्यकीय चाचण्यांसाठी कराडमधील कृष्णा हॉस्पिटलची निवड करण्यात आली आहे. हे प्रयत्न यशस्वी ठरल्यास कराडचे नाव जगाच्या नकाशावर झळकणार आहे. (Satara Karad Krishna Hospital in Corona Vaccine Research Project)

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून ‘कोरोना’वर लस विकसित करण्यात येत आहे. लसीच्या वैद्यकीय चाचण्यांना देशभरात येत्या आठवड्यात प्रारंभ होणार आहे. या चाचण्यांसाठी कराडच्या कृष्णा हॉस्पिटलची निवड करण्यात आल्याची माहिती ‘कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट’चे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी दिली. हॉस्पिटलमधील अत्याधुनिक सुविधा, सुसज्ज इन्फ्रास्ट्रक्चर, तज्ज्ञ स्टाफ, वैद्यकीय संशोधनाचा दीर्घ अनुभव या निकषांच्या आधारे या प्रकल्पासाठी निवड करण्यात आली

स्पेशल रिपोर्ट : पुण्यात अँटिबॉडी टेस्ट किटची निर्मिती, भारताला मोठं यश

पुण्यातील जगप्रसिद्ध सीरम इन्स्टिट्यूटने प्रतिबंधक लस विकसित केली आहे. या लसीच्या वैद्यकीय चाचण्यांना देशभरात लवकरच सुरुवात होईल. या वैद्यकीय चाचण्यांसाठी निवड करण्यात आलेल्या भारतातील 40 वैद्यकीय संशोधन केंद्रांमध्ये कराडच्या कृष्णा हॉस्पिटलचा समावेश आहे.

सीरम इन्स्टिट्यूटने आतापर्यंत धनुर्वात, गोवर, डेंग्यू यासारख्या आजारांवरील लस शोधल्या आहेत. अमेरिकन बायोटेक्नॉलॉजी कंपनी ‘कोडाजेनिक्स’च्या मदतीने सीरम इन्स्टिट्यूटने फेब्रुवारीतच कोरोनावर मात करणारी लस विकसित करण्यास प्रारंभ केला होता.

‘ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’कडून या लसीच्या वैद्यकीय चाचण्यांसाठी मान्यता मिळाली होती. देशातील 40 निवडक संस्थांमध्ये होणाऱ्या या वैद्यकीय चाचण्यांसाठी गोव्याच्या ‘सीआरओएम क्लिनिकल रिसर्च अ‍ॅन्ड मेडिकल टुरिझम’ या एनएबीएच मान्यताप्राप्त संस्थेचे सहकार्य लाभणार आहे.

पहिल्या टप्प्यात हाय रिस्क गटात मोडणाऱ्या आरोग्य कर्मचारी, पोलीस, सुरक्षारक्षक, भाजीपाला आणि फळ विक्रेते, किराणामाल विक्रेते यांचा अभ्यास केला जाईल. वैद्यकीय चाचण्या यशस्वी झाल्यास ही लस लवकरच सर्सावमान्य रुग्णांसाठीही उपलब्ध होईल.

“सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्याची परिस्थती गंभीर आहे. त्यामुळे संपूर्ण तालुका कंटनेमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. कराडमध्ये दूध, औषधं आणि किराणा सामान या जीवनाश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी संघर्ष सुरु आहे. याशिवाय बँका आणि पेट्रोल पंपही बंद करण्यात आले आहेत”, असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं होतं.

(Satara Karad Krishna Hospital in Corona Vaccine Research Project)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.