स्पेशल रिपोर्ट : पुण्यात अँटिबॉडी टेस्ट किटची निर्मिती, भारताला मोठं यश

स्पेशल रिपोर्ट : पुण्यात अँटिबॉडी टेस्ट किटची निर्मिती, भारताला मोठं यश

कोरोनाविरोधात लढताना भारताला एक मोठं यश आलं आहे (Antibody Test Kit). भारतीय संशोधकांकडून अँटिबॉडी टेस्ट किटची निर्मिती करण्यात आली आहे.

चेतन पाटील

| Edited By: Nupur Chilkulwar

May 12, 2020 | 12:33 AM

पुणे : कोरोनाविरोधात लढताना भारताला एक मोठं यश आलं आहे (Antibody Test Kit). भारतीय संशोधकांकडून अँटिबॉडी टेस्ट किटची निर्मिती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पुण्यातल्या संशोधकांकडून या अँटीबॉडी टेस्ट किटची निर्मिती करण्यात आली आहे. एलिसा अँटीबॉडी टेस्ट किट असं या किटचं नाव आहे (Antibody Test Kit).

पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजीने या किटची निर्मिती केली आहे. एलिसा अँटीबॉडी टेस्ट किटमुळे किती लोकसंख्येला किंवा समुहाला कोरोनाची लागण होऊ शकते, याचा अंदाज येईल. कारण कोरोना व्हायरसमुळे बाधित व्यक्तीच्या शरीरात व्हायरसशी लढण्यासाठी अँटीबॉडीज तयार होतात.

मुंबईत 2 वेगवेगळ्या ठिकाणी याची टेस्टिंग करण्यात आली. त्यावेळी ही किट योग्य असल्याचं निदर्शनास आलं. अडीच तासांत या किट्सच्या माध्यमातून 90 सॅम्पल टेस्ट करण्यात आल्या. आता या किट्सच्या कमर्शिअल प्रोडक्शनसाठी जायडस कॅडिला कंपनीला परवानगी देण्यात आली आहे.

एलिसा अँटीबॉडी टेस्ट किटमुळे शरिरातील अँटिबॉडीजची माहिती मिळते. तर कोरोनाच्या निदानासाठी RT PCR किटचा वापर करावा लागतो. अँटीबॉडी टेस्ट किट आणि RT PCR किटमध्ये फरक आहे.

अँटीबॉडी टेस्ट किट आणि RT PCR किटमध्ये फरक काय?

  •  कोरोना व्हायरसमुळे बाधित व्यक्तीच्या शरीरात अँटीबॉडीज तयार होतात. त्याचा शोध अँटिबॉडी टेस्टद्वारे घेण्यात येते. रिझल्ट लवकर येतो. तर कोरोना तपासणीसाठी RT PCRचा अहवाल येण्यासाठी जवळपास 24 तास लागतात.
  • अँटीबॉडी टेस्ट किटद्वारे निदान करण्यासाठी रक्ताचे 2 थेंब घेतले जातात. तर RT PCR टेस्ट करण्यासाठी रुग्णाचा स्वॅब घेतला जातो.

अँटिबॉडी टेस्ट किट तयार करुन भारतानं पहिलं यशाचं पाऊल टाकलं आहे. येत्या काळात लसही शोधण्यात यश येईल, अशी आशा देशातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

कोरोनाविरोधात लढण्यासाठी केंद्र सरकारकडून 70 प्रोजेक्ट्सला मंजुरी

दुसरीकडे केंद्र सरकारनं कोरोनासंदर्भात लढण्यासाठीच्या जवळपास 70 प्रोजेक्टसना  मंजुरी दिली आहे. बेनेट युनिव्हर्सिटी, जेएनयू सारख्या विविध संस्थाकडून प्रस्ताव आले आहेत. लस तयार करण्यापासून ते उपचारपद्धती संदर्भातले हे प्रोजेक्ट आहेत. यात 10 प्रोजेक्ट हे लसीसंदर्भात, 34 प्रोजेक्ट तपासणी आणि निदानाबाबत आहेत. 10 प्रोजेक्ट उपचारपद्धती, आणि 14 प्रोजेक्ट कोरोनावर नियंत्रणासंदर्भातले आहेत. तर 2 प्रस्ताव हे इतर आजारावरील औषधींचा कोरोनावर वापर करण्यासंदर्भाते आहेत.

संबंधित बातम्या :

Maharashtra Corona Update | राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 23,401 वर, दिवसभरात 1,230 नवे रुग्ण

Pune Lockdown : पुण्यात येणाऱ्यांची वैद्यकीय तपासणी बंधनकारक

दिल्लीत अडकलेले UPSC चे 1600 विद्यार्थी महाराष्ट्रात परतणार, विशेष रेल्वेची व्यवस्था

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें