खंबाटकी घाटात कारने अचानक घेतला पेट, भडका उडून काही क्षणांत कार जळून खाक

मुंबईहून वाईला जाणाऱ्या कारने सातारा येथील खंबाटकी घाट उतरत असतानाच अचानक पेट घेतला आणि आगीचा भडका उडून काही क्षणांत कार जळून खाक झाली.

खंबाटकी घाटात कारने अचानक घेतला पेट, भडका उडून काही क्षणांत कार जळून खाक

सातारा : मुंबईहून वाईला जाणाऱ्या कारने सातारा येथील खंबाटकी घाट उतरत असतानाच अचानक पेट घेतला आणि आगीचा भडका उडून काही क्षणांत कार जळून खाक झाली. ही दुर्घटना रात्री उशीरा घडली आहे. कारमधील दोघेजण वेळीच कारमधून बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. (Satara khambataki ghat Car burn)

भुईंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेळे गावानजीक पहिल्याच वळणावर ही दुर्घटना घडली. मुंबईहून वाईला ही कार चालली होती. घाटरस्त्यात उतारावरील वळणावर कार आली तेव्हाच कारने पेट घेतला.

इंजिन जास्त गरम झाल्याने शॉर्ट सर्किट होवून ही आग लागल्याचा प्राथमिक व्यक्त केला जात अंदाज आहे. वेळे गावातील लोकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत घाटातील संपूर्ण वाहतूक थांबवली.

दरम्यान, किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशामक बंबाने ही आग आटोक्यात आणली.या घटनेची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली आहे. (Satara khambataki ghat Car burn)

संबंधित बातम्या

मुंबई : विक्रोळीत धावत्या कारने पेट घेतला

Live Update : मुंबई-गोवा महामार्गावर कारने घेतला पेट

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI