एटीएममधून लाखो रुपयांची चोरी, आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश, दोघांना हरियाणातून अटक

मागील महिन्यात सातारा शहरातील कॅनरा बँकेच्या एटीएममधून अज्ञात चोरट्यांनी एटीएममध्ये अफरातफर करत चालाखीने पैसे काढले.

एटीएममधून लाखो रुपयांची चोरी, आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश, दोघांना हरियाणातून अटक
Nupur Chilkulwar

|

Oct 21, 2020 | 9:44 PM

सातारा : महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश येथे (Satara Police Solve ATM Robbery Case) एटीएम मशीनमधील लाखो रुपये चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा छडा लावण्यात सातारा पोलिसांना यश आला आहे. याप्रकरणी दोघांना हरियाणा येथे अटक करण्यात आली आहे (Satara Police Solve ATM Robbery Case).

मागील महिन्यात सातारा शहरातील कॅनरा बँकेच्या एटीएममधून अज्ञात चोरट्यांनी एटीएममध्ये अफरातफर करत चालाखीने पैसे काढले. जिल्ह्यात तीन ठिकाणी कॅनरा बँकेच्या एटीएममधून ही रक्कम काढली होती. या प्रकरणी अज्ञातांविरुध्द सातारा शाहुपुरीसह सातारा शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. या चोरट्यांचे पैसे काढतानाचे चित्रिकरण सीसीटीव्हीत कैद झाल्यामुळे काही गोपनीय माहितीच्या आधारावर सातारा पोलीस दलातील एक पथक हरियाणा राज्यात रवाना झाले होते.

या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपींबाबत माहिती मिळवून आरोपी पळून जात असताना पाठलाग करुन दोघांना ताब्यात घेतले. यानंतर त्यांच्याकडे चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश येथील तब्बल 711 वेळा एटीएम मशीनमधील कॅश व्यवहार करुन लाखो रुपये चोरल्याची कबुली या आंतरराज्य टोळीतील दोघांनी दिली आहे (Satara Police Solve ATM Robbery Case).

सातारा पोलीस विभागातील धाडसी अधिकारी आणि कर्मचारी यांनी संबंधित संशयित आरोपींना हरियाणा येथे जाऊन पाठलाग करुन पकडल्यामुळे सातारा पोलिसांचे कौतुक केले जात आहे. संशयित आरोपींकडून दोन लाख रुपये आणि एक चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे. सकरुद्दीन फैजरु आणि रवी चंदरपाल दोघे हरियाणामध्ये राहणारी असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

सातारा शहरातील राधिका चौकातील कॅनरा बँकेच्या एटीएममधून अनोळखी व्यक्तींनी 20 आणि 21 सप्टेंबरला एटीएमधून हातचलाखीने दोन लाखांची रक्कम लंपास करत बँकेची फसवणूक केली होती. मात्र, सातारा पोलिसांनी या टोळीतील मुख्य सुत्रधाराचा छडा लावल्यामुळे या प्रकरणात आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Satara Police Solve ATM Robbery Case

संबंधित बातम्या :

कल्याणमध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर ड्रग्ज माफियांचा प्राणघातक हल्ला, चौघांना अटक

मटणाच्या दुकानातून चाकू चोरीला, एकाचा खून, चौघे जखमी, बंगळुरुत माथेफिरुला अटक

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें