प्लॅस्टिकप्रमाणे आवाजी फटाक्यांवर कायमची बंदी आणा, सत्यजीत तांबेंची आदित्य ठाकरेंकडे मागणी

प्लॅस्टिकप्रमाणे आवाजी फटाक्यांवर कायमची बंदी आणा, सत्यजीत तांबेंची आदित्य ठाकरेंकडे मागणी

मोठ्या आवाजाच्या आणि धूर करणाऱ्या फटाक्यांवर कायमस्वरुपी बंदी घाला, अशी सत्यजित तांबेंची मागणी आहे

अनिश बेंद्रे

|

Nov 06, 2020 | 1:47 PM

मुंबई : प्लॅस्टिकप्रमाणे मोठ्या आवाजाच्या आणि धूर करणाऱ्या फटाक्यांवर (Crackers) कायमस्वरुपी बंदी आणावी, अशी मागणी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्याकडे केली आहे. (Satyajeet Tambe urges Aditya Thackeray to ban Crackers forever)

“पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना विनंती आहे, कृपया मोठे आवाज करणाऱ्या आणि धूर करणाऱ्या फटाक्यांवर, प्लॅस्टिकवर ज्या पद्धतीने बंदी घातली, त्याप्रमाणे कायमस्वरुपी बंदी घाला. पुढच्या येणाऱ्या सात पिढ्या आपल्याला आशीर्वाद देतील” असे ट्विट सत्यजित तांबे यांनी केले आहे.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून यंदाच्या दिवाळीसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. गृह विभागाने परिपत्रक जारी करुन नागरिकांना दिवाळी साध्या पद्धतीने साजरी करण्याचं आवाहन केलं आहे.

फटाक्यांची आतषबाजी करु नये. फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे कोरोनाचं संक्रमण वाढण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांनी फटाके फोडणे टाळावे, त्याऐवजी दिव्यांची आरास मोठ्या प्रमाणात करुन उत्सव साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना :

1. दिवाळी सण कोरोना काळात साजऱ्या केलेल्या अन्य सणांप्रमाणेच पूर्ण खबरदारी घेऊन अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करावा.

2. दिवाळी उत्सव घरगुती स्वरुपात मर्यादित राहील याची दक्षता घेण्यात यावी.

3. उत्सव कालावधीत ज्येष्ठ नागरिक आणि लहान बालकांनी घराबाहेर पडणं शक्यतो टाळावे. तसेच नागरिकांनी गर्दी टाळावी. मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊ नये. मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.

4. फटाक्यांची आतषबाजी करु नये. फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे कोरोनाचं संक्रमण वाढण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांनी फटाके फोडणे टाळावे. त्याऐवजी दिव्यांचा आरास मोठ्या प्रमाणात करुन उत्सव साजरा करावा. (Satyajeet Tambe urges Aditya Thackeray to ban Crackers forever)

मुंबईकरांसाठी विशेष सूचना

यंदा दिवाळीत फटाके फोडल्यास मुंबईकरांना कारवाईस सामोरे जायला लागू शकते. यावर्षी मरिन ड्राईव्ह, जुहू बीच, वरळी सीफेस यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडता येणार नसल्याचे सांगितले जात आहे. फटाके फोडण्यासंदर्भात मुंबई महापालिका एक एसओपी जारी करणार आहे. त्यानुसार मर्यादित स्वरुपातच फटाके फोडण्यास परवानगी देण्यात येणार आहे. तसेच सोसायटी आणि घराच्या आवारातच फटाके फोडण्याच्या सूचनाही करण्यात येणार आहेत. सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडल्यास मुंबई महापालिकेकडून पोलिसांच्या मदतीनं कारवाई होणार आहे.


संबंधित बातम्या :

दिवाळी पहाट आणि फटाक्यांना बंदी, राज्य सरकारकडून गाईडलाईन्स जारी

केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय; फटाक्यांवर कडक निर्बंध, पर्यावरणपूरक फटाक्यांनाही नो एन्ट्री

(Satyajeet Tambe urges Aditya Thackeray to ban Crackers forever)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें