रत्नागिरी : तुम्ही जर सुट्टीचं नियोजन गणपतीपुळे येथे करणार असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. मुसळधार पावसाचा मोठा फटका गणपतीपुळे देवस्थानला बसला आहे. या पावसाने गणपतीपुळे मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गाची संरक्षक भिंतच ठिकठिकाणी कोसळली. त्यामुळे मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग पुढचे काही दिवस बंद राहणार आहे. देवस्थानचे अध्यक्ष डॉ. विवेक भिडे यांनी याबाबत माहिती दिली. यामुळे भाविकांची मात्र मोठी गैरसोय होणार आहे.