AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shahrukh Khan | किंग खानचा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, आर. माधवनसोबत ‘या’ भूमिकेत झळकणार!

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान बर्‍याच दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. शाहरुख खान ‘झिरो’ या चित्रपटात शेवटचा दिसला होता.

Shahrukh Khan | किंग खानचा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, आर. माधवनसोबत ‘या’ भूमिकेत झळकणार!
Shahrukh Khan
| Updated on: Oct 30, 2020 | 4:48 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान बर्‍याच दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. शाहरुख खान ‘झिरो’ या चित्रपटात शेवटचा दिसला होता. त्यानंतर शाहरुख खानचा कोणताही नवा चित्रपट आलेला नाही. शाहरुख खानच्या नवीन चित्रपटाची प्रतीक्षा चाहते आतुरतेने करत होते. मात्र, आता चाहत्यांची प्रतीक्षा संपणार असून शाहरुख खान आर.माधवनच्या ‘रॉकेट्री’ चित्रपटात दिसणार आहे. (Shahrukh Khan and R Madhavan new Movie Rocketry)

स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार शाहरुख खान आर. माधवनच्या ‘रॉकेट्री’ चित्रपटात टीव्ही पत्रकाराची भूमिका करणार आहे. ‘रॉकेट्री’ चित्रपटात शाहरुख खानची भूमिका महत्त्वाची आहे. परंतु, शाहरुख खानने ‘रॉकेट्री’ चित्रपटाची अधिकृत घोषणा अद्याप केलेली नाही. रिपोर्ट्सनुसार शाहरुख खान यानंतर राजकुमार हिरानीच्या चित्रपटात दिसणार आहे. आर. माधवन यांचा हा चित्रपट माजी वैज्ञानिक आणि एयरोस्पेस इंजीनियर नंबी नारायणन यांचा बायोपिक आहे. त्यांना षडयंत्र हेरगिरीच्या आरोपाखाली कसे अडकवण्यात आले होते, यावर आधारित हा चित्रपट आहे.

शाहरुख खान 2018मध्ये ‘झिरो’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ शाहरुख खान यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करू शकला नाही. तेव्हापासून शाहरुख खानने अभिनयातून माघार घेतली आणि प्रॉडक्शनमध्ये काम करत होता. शाहरुख खानची रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि दृश्यम फिल्म्स एक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. या चित्रपटाचे नाव ‘लव्ह हॉस्टेल’ असे ठेवण्यात आले आहे. शंकर रमन हे या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक आहेत. या चित्रपटात सान्या मल्होत्रा, विक्रांत मेस्सी आणि बॉबी देओल दिसणार आहेत.

उत्तर भारताच्या पार्श्वभूमीवर आधारित ही कथा आहे. या चित्रपटाची कथा एका तरुण जोडप्याच्या अस्थिर प्रवासाविषयी आहे. या तरूण जोडप्याची आयुष्य जगण्यासाठीची धडपड सुरू आहे. प्रेम, मनोरंजन,गुन्हेगारी-थ्रिलर आदी मसाला या चित्रपटात आहे. शंकर रमन हे राष्ट्रीय पुरस्कार विजेते सिनेमॅटोग्राफर असून, त्यांनी यापूर्वी ‘गुडगाव’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ‘चित्रपटात ‘लव्ह हॉस्टेल’ हा केवळ आपल्या समाजाचाच नाही, तर आपल्या समस्या सोडविण्यावर प्रकाश टाकतो’, असे शंकर रमन म्हणाले. ‘लव्ह हॉस्टेल’ हा चित्रपट गौरी खान, मनीष मुंद्रा आणि गौरव वर्मा निर्मित करणार आहेत. रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि दृश्यम फिल्म्स अंतर्गत हा चित्रपट तयार होणार आहे. चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षाच्या सुरूवातीस सुरू होईल आणि त्याच वर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. चित्रपटाचे पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या : 

शाहरुख खानसोबत सामना पाहण्यासाठी बसलेला हा तरुण कोण?

Mirzapur 2 Controversy | ‘मिर्झापूर 2’ पुन्हा वादात अडकण्याची शक्यता, प्रसिद्ध लेखकाकडून कायदेशीर कारवाईचा इशारा!

(Shahrukh Khan and R Madhavan new Movie  Rocketry)

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.