AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Palghar mob lynching : पालघरप्रकरणी राजकारण नको, सर्व आरोपी अटकेत : शरद पवार

पालघर प्रकरणावरुन राजकारण करु नका (Sharad Pawar on Palghar mob lynching). त्याचा कोरोनाशी काही संबंध नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.

Palghar mob lynching : पालघरप्रकरणी राजकारण नको, सर्व आरोपी अटकेत : शरद पवार
| Updated on: Apr 21, 2020 | 12:45 PM
Share

मुंबई : पालघर प्रकरणावरुन राजकारण करु नका (Sharad Pawar on Palghar mob lynching). त्याचा कोरोनाशी काही संबंध नाही. सध्याच्या स्थितीत नकारात्मकता कमी करण्याची गरज आहे. पालघर हत्याप्रकरणी आरोपी गजाआड आहेत. कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचं चुकीचं चित्र निर्माण केलं जात आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. शरद पवार यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आज जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक सूचना दिल्या (Sharad Pawar on Palghar mob lynching).

“पोलीस, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी दिवसरात्र काम करत आहेत, त्यांच्या कुटुंबावर ताण वाढणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्याचे सर्व मंत्री, प्रशासनाचे सर्व कर्मचारी, डॉक्टर, आरोग्य सेवक अहोरात्र काम करत आहेत, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करा, त्यांना त्रास देऊ नका”, असं आवाहन शरद पवार यांनी केलं.

“रमजानच्या काळात आपल्या घरातच नमाज वाचा. सरकारकडून बाहेर नमाज पढण्याची सवलत नाही. आपण सहकार्य करावे, घरातच रोजा सोडा, सर्वांनी एकत्र येण्याची गरज नाही. अल्पसंख्याक समाज सहकार्य करेल याची खात्री”, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

“वृत्तपत्रांवर बंदी नाही. पेपर वाचल्याशिवाय अनेकांचा दिवस सुरु होत नाही, याची कल्पना आहे. मात्र तूर्तास वितरणावर बंदी, मुंबईत 70 हजार मुलं घरोघरी जाऊन पेपर वाटतात. संसर्गाचा धोका पाहता वितरणावर बंदी आहे. मात्र, वृत्तपत्र विकत मिळत आहेत. संकटांबाबत निगेटिव्ह विचार सोडून द्या, बातमी भीती निर्माण करणाऱ्या नको, आत्मविश्वास वाढवणाऱ्या हव्या, ही माध्यमांना विनंती आहे”, असं शरद पवार यांनी सांगितलं.

“कुस्तीपटूसोबतच सिने कलाकार, तमाशा कलावंत यांचेही कार्यक्रम बंद आहे., त्यांना सरकारकडून काही मदत करता येईल का, हे पाहावे लागेल”, असं शरद पवार म्हणाले.

“राष्ट्रपती भवनात ‘कोरोना’चा शिरकाव झाल्याचं वृत्त आहे. तिथे काही रुग्ण सापडले आहेत. दोन व्यक्तींमध्ये अंतर ठेवण्याची गरज आहे. आपण काळजी घेतलीच पाहिजे. आपण पुढचे 12 दिवस काळजी घेतली, तर लॉकडाऊनच्या काळात वाढ करावी लागणार नाही. खबरदारी घेतली, तर पंतप्रधान आणि मुख्यमंत्री त्याबाबत योग्य निर्णय घेतील”, असं शरद पवार यांनी सांगितलं.

“पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत आपली स्थिती बरी असली, तरी समाधान मानता कामा नये, हि स्थिती कशी सुधारता येईल, हे पाहायला हवे, मुंबई, पुणे, ठाणे, कल्याणमध्ये अधिक काळजी घ्यावी लागेल. अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण-डोंबिवली अशी ठिकाणं वगळता इतरत्र थोडी सवलत देण्याची शक्यता निर्माण होऊ शकते, शेती आणि काही उद्योगांना परवानगी देता येऊ शकेल”, असं शरद पवार म्हणाले.

“अमेरिकेसारखा आरोग्य आणि संसाधनांची उत्तम स्थिती असलेला देश, पण तिथे ‘कोरोना’मुळे मृत्यू पडलेल्या नागरिकांची संख्या 40 हजारावर गेली आहे. भारतात कोरोनामुळे 590 जणांचा मृत्यू झाला आहे, तर महाराष्ट्रात सर्वाधिक 223 जणांचा मृत्यू झाला. इटलीसारखा देश ज्याचं आकारमान महाराष्ट्रासारखं आहे तिथे 23 हजार बळी, पण राज्यातील 223 हा आकडा धक्कादायकच आहे. पाश्चिमात्य देशांशी तुलना नको”, असं शरद पवार म्हणाले.

संबंधित बातम्या :

अमेरिकेत स्थलांतरबंदी, नागरिकांच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी डोनाल्ड यांचे ‘ट्रम्प’ कार्ड

Lockdown : ठाणे पोलिसांची गांधीगिरी, मॉर्निंग वॉक करणाऱ्या आगाऊ नागरिकांची भर चौकात आरती

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.