उद्ध्वस्त किल्लारीला पुन्हा उभं केलं, पण कोकणची अडचण शरद पवारांनी सांगितली!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे चक्रीवादळाने नुकसान झालेल्या कोकणची पाहणी करण्यासाठी दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. (Sharad Pawar recalled latur earthquake)

उद्ध्वस्त किल्लारीला पुन्हा उभं केलं, पण कोकणची अडचण शरद पवारांनी सांगितली!

रायगड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे चक्रीवादळाने नुकसान झालेल्या कोकणची पाहणी करण्यासाठी दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. पवारांनी आज रायगडमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी शरद पवारांनी लातूरमधील किल्लारीत 1993 मध्ये झालेल्या भूकंपाची आठवण सांगितली. (Sharad Pawar recalled latur earthquake during konkan visit)

“भूकंपाने उद्ध्वस्त झालेल्या लातूर भूकंपात 1 लाख 80 हजार घरं पडली, तिथं पक्की घरं आम्ही उभी केली. पण लातूरमधील किल्लारीसारखी योजना या भागात (कोकणात) करण्यासाठी काही अडचणी आहेत. इथे जमीन कमी आहे, इथली घरे दुरुस्त करण्यासाठी, लोकांना अधिवास निर्माण करण्यासाठी पुरेशी जागा नाही. त्यामुळे नुकसानग्रस्तांना थेट मदत कशी देता येईल यावर भर देण्यात येईल”, असं शरद पवार म्हणाले.

हे महाराष्ट्रावरचे संकट आहे. यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन यावर मात करण्याची गरज आहे. आता केंद्र आणि राज्य सरकारची जबाबदारी पाहण्याची वेळ नाही. एकत्र येऊन संकटावर मात करण्याची ही वेळ आहे, असं शरद पवारांनी सांगितलं.

अम्फान चक्रीवादळात झालेल्या नुकसानासाठी पश्चिम बंगालला केंद्राने जे पॅकेज दिलं त्याबद्दल दुमत नाही. त्याठिकाणी 18 जिल्ह्यांचे नुकसान झाले आहे. आमचे म्हणणे इतकेच आहे की आम्ही जेव्हा मदतीच्या मागणीसाठी येऊ तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमच्याबाबतही तसाच प्रेमाचा दृष्टीकोन ठेवावा, असंही पवार म्हणाले.

राजनाथ सिंहांना टोला

दरम्यान, यावेळी शरद पवारांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं.“आमच्याकडे सर्कसमध्ये प्राणी आहेत. त्याचबरोबर सर्कसमध्ये विदुषकाची कल्पना आहे. पण विदुषकाची कमी आहे”, असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे.

“महाराष्ट्र सरकार हे तीन पक्षांचे सरकार आहे. असं वाटतं की सरकारच्या नावाखाली ‘सर्कस’ होत आहे. महाराष्ट्र शासनाकडे ज्या प्रकारची दूरदृष्टी असायला हवी, तीच दिसत नाही” अशी टीका राजनाथ यांनी केली होती. त्यांच्या याच टीकेवर पवारांनी उत्तर दिलं.

(Sharad Pawar recalled latur earthquake during konkan visit)

संबंधित बातम्या  

चक्रीवादळग्रस्तांसाठी नियमापेक्षा जास्त मदत, घरासाठी 95 हजारांऐवजी दीड लाख, दोन महिने मोफत धान्य

आमच्याकडे सर्कसमध्ये प्राणी आहेत, मात्र विदुषकाची कमी, राजनाथ सिंह यांच्या टीकेवर पवारांचं प्रत्युत्तर

भूकंपानंतर उद्ध्वस्त किल्लारी पुन्हा उभारणारा अधिकारी सांगलीत 

Published On - 9:39 pm, Tue, 9 June 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI