Exclusive : ईडीची कारवाई कशासाठी मलाच माहीत नाही; कायदेशीर लढाई लढण्याचे सरनाईक यांचे सुतोवाच

ईडीने छापेमारी केल्यानंतर अखेर नऊ तासाने शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनील 'टीव्ही 9 मराठी'ला सर्वात आधी प्रतिक्रिया दिली आहे. (ShivSena MLA Pratap Sarnaik reaction on ED raids in his residence)

Exclusive : ईडीची कारवाई कशासाठी मलाच माहीत नाही; कायदेशीर लढाई लढण्याचे सरनाईक यांचे सुतोवाच
Follow us
| Updated on: Nov 24, 2020 | 6:15 PM

मुंबई: ईडीने छापेमारी केल्यानंतर अखेर नऊ तासाने शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला सर्वात आधी प्रतिक्रिया दिली आहे. ईडीने का कारवाई केली याची मला माहिती नाही. हीच माहिती घेण्याचा मी प्रयत्न करत आहे, असं प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं. तसेच कायदेशीर लढाई लढणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. (ShivSena MLA Pratap Sarnaik reaction on ED raids in his residence)

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीने आज छापे मारले. त्यानंतर सरनाईक यांचे चिरंजीव विहंग सरनाईक यांना ताब्यात घेतले. यावेळी प्रताप सरनाईक घरी नव्हते. ते परदेशात असल्याचं बोललं जात होतं. मात्र ‘टीव्ही 9 मराठी’ने अखेर त्यांच्याशी संवाद साधला. त्यामुळे ते मुंबईतच असल्याचं उघड झालं आहे. ‘टीव्ही 9 मराठी’ने सर्वात आधी सरनाईक यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. यावेळी हे काय प्रकरण आहे? काय आहे? ईडीने आम्हाला कशाला बोलावलं? हे मला माहीत नाही, असं सरनाईक यांनी सांगितलं.

या कारवाईविरोधात तुम्ही कायदेशीर लढाई लढणार आहात का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर होय अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. नक्की काय ते पाहू. ईडीने कशाच्या आधारे कारवाई केली ते पाहू, असंही ते म्हणाले.

सरनाईक हे मुंबईतच होते?

‘टीव्ही 9 मराठी’ला मिळालेल्या माहितीनुसार प्रताप सरनाईक हे भारताबाहेर नव्हते. ते मुंबईतच होते. मात्र ते नेमके कुठे होते, याबाबतची माहिती मिळू शकली नाही. ईडीने कारवाई केल्यानंतर सर्व अंदाज घेतल्यावरच त्यांनी प्रभादेवी येथील ‘सामना’च्या कार्यालयात जाऊन शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेऊन त्यांच्याशी दीड तास चर्चा केली. यावेळी काय चर्चा झाली याचा तपशील देण्यास त्यांनी नकार दिला.

सरनाईक यांच्या घरावरील छापेमारीचा घटनाक्रम

मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी आज सकाळी 8 वाजता ईडीने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर छापे मारले. सरनाईक यांच्या घर, कार्यालय आणि दहा ठिकाणांवर हे छापे मारण्यात आले. सरनाईक यांचे चिरंजीव विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावरही छापे मारण्यात आले. तब्बल चार तासांच्या चौकशीनंतर ईडीने अखेर विहंग सरनाईक यांना ताब्यात घेतलं.

ईडीने ठाण्यातील हिरानंदानी येथील प्रताप सरनाईक यांच्या 23व्या मजल्यावरील घरावर, वर्तकनगरमधील कार्यालयावर आणि घोडबंदर रोडवरील विहंगम हॉटेलवर आज सकाळी धाड मारली. त्याच बरोबर सरनाईक यांच्या विहंग आणि पूर्वेश या दोन्ही चिरंजीवांच्या कार्यालय आणि घरावरही धाड मारली. ईडीने सरनाईक यांच्या एकूण दहा ठिकाणांवर धाड मारली आहे. ही धाड मारण्यापूर्वी ईडीने पूर्ण तयारी केली होती. ईडीने पोलिसांसह स्थानिक प्रशासनालाही या धाडीचा सुगावा लागू दिला नाही. (ShivSena MLA Pratap Sarnaik reaction on ED raids in his residence)

संबंधित बातम्या:

Exclusive: प्रताप सरनाईक आणि संजय राऊत यांची ‘सामना’च्या कार्यालयात भेट; दीड तास गुप्त चर्चा

आम्ही शहीद होऊ, पण गुडघे टेकणार नाही, शिवसेना सरनाईकांच्या पाठीशी : संजय राऊत

प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीची कारवाई योग्यच; सोमय्यांकडून समर्थन

(ShivSena MLA Pratap Sarnaik reaction on ED raids in his residence)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.