फेक अकाऊंटवरुन प्रियांका गांधी, अनिल देशमुख यांच्याविरोधात अश्लील पोस्ट, आरोपीला बेड्या

प्रियांका गांधी (Priyanka Gandhi)  तसेच अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविरोधात सोशल मीडियावर अश्लील पोस्ट करणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

फेक अकाऊंटवरुन प्रियांका गांधी, अनिल देशमुख यांच्याविरोधात अश्लील पोस्ट, आरोपीला बेड्या
prajwal dhage

|

Oct 14, 2020 | 11:49 AM

मुंबई : काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka Gandhi)  तसेच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविरोधात सोशल मीडियावर अश्लील पोस्ट (social media obscene post ) केल्याचा प्रकार घडलाय. पुण्याच्या श्रिशैल शरणप्पा खज्जे याने फेसबुकवर या अश्लील पोस्ट केल्याचा आरोप असून, मुंबई पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. तो मूळचा उस्मानाबाद जिल्ह्याचा रहिवासी असून तो पुण्यात चिखली येथे एका खासगी कंपनीत कामावर आहे. (social media obscene post on Priyanka Gandhi and Anil Deshmukh accused arrested from Pune)

फेक अकाऊंटवरुन अश्लील पोस्ट

मुंबई सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी श्रीशैल याने, आप्पा केसर जावळगेकर (Appa Keasar javalgekar) या नावाने फेसबुकवर फेक अकाऊंट तयार केले. याच अकाऊंटवरुन त्याने प्रियांका गांधी आणि अनिल देशमुख यांच्याविरोधात अश्लील पोस्ट केली. याबाबत तक्रार आल्यानंतर मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 6 ने 9 ऑक्टोबरला गुन्हा दाखल केला. तसेच गुन्ह्याचा तपास सुरु केला. तपासात गुन्हे शाखेच्या युनीट 6 ला श्रीशैलच्या फेक फेसबुक अकाऊंटची माहिती मिळाली आणि पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.

दरम्यान, मुंबई गुन्हे शाखेकडून याबाबत अधिक तपास सुरु आहे. पोलीस आरोपी श्रीशैलची कसून चौकशी करत आहेत. त्याने याधीही काही आक्षेपार्ह पोस्ट केलेल्या आहेत का? तसेच आरोपीला काही राजकीय पार्श्वभूमी आहे का? ती असेल तर, यामागे नेमका कुणाचा हात असावा? या सर्व गोष्टींचा तपास मुंबई पोलिसांकडून केला जातोय. तसेच अश्लील पोस्ट करण्यामागे त्याचा नेमका काय उद्देश असावा, याचीही चौकशी मुंबई पोलीस करत आहे.

संबंधित बातम्या : सायबर क्राईम पोलिसांकडे ‘नो टाईम’, पीडितांची फरफट?

नागपुरात लॉकडाऊनमध्ये सायबर गुन्ह्यात मोठी वाढ, महिला सॉफ्ट टार्गेट

एटीएम बदलण्याच्या नावे लुटालूट, सायबर चोरट्यांचा सुळसुळाट

(social media obscene post on Priyanka Gandhi and Anil Deshmukh accused arrested from Pune)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें